Noida Viral Video : उत्तर प्रदेशमधील नोएडातल्या एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतो आहे. नोएडामधील गार्डन्स गॅलेरिया मॉलमधील क्लबमध्ये वादग्रस्त घटना घडली आहे. मॉलमधील लॉर्ड ऑफ ड्रिंक्स बारमध्ये दारू पार्टी सुरू असताना अचानक स्क्रीनवर रामायणमधील रावण आणि रामचं युद्ध सुरु असलेला एक व्हिडीओ सुरु झाला. या रामायणमधील संवादावर क्लबमध्ये दारुचे ग्लॉस हातात घेऊन नाचताना दिसतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर हा रामायणातील व्हिडीओ डबिंग करुन वापरण्यात आला आहे. हे सगळं सुरु असताना कोणीतरी मोबाईलमध्ये हे सगळं कैद केलं. आता तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. (ramayana dubbed track video played at Noida gardens galleria mall club liquor dance party video trending on google)


रामानंद सागर यांच्या रामायण या सीरियलबाबत चाहते आजही खूप भावूक आहेत. अनेकांसाठी त्यातील रामाची आणि सीतेची भूमिका करणारे कलाकार चाहत्यांसाठी देवच आहे. त्यामुळे क्लबमध्ये अशाप्रकारे रामायणातील व्हिडीओ डान्स केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. 


सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटवर Privesh Pandey या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 



हा व्हिडीओ व्हायरल होतातच नोएडा पोलिसांनी या क्लबवर कारवाई केली आहे. क्लबचे मालक आणि व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली आहे.  गौतम बुद्ध पोलीस आयुक्तालयाने ट्विटरवर या घटनेबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले आहे की, या घटनेसंदर्भात नोएडाच्या सेक्टर-39 पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 



गेल्या वर्षी नोएडाचे गार्डन गॅलेरिया हे चर्चेत आलं होतं. त्यावेळी क्लबमध्ये पार्टी करणाऱ्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये भांडण झाली होती. या वादावादीत एका मृत्यू झाला होता. याही घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.