हैदराबाद  :  केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले हे त्यांच्या शीघ्र कवितेसाठी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात प्रसिद्ध आहेत. भाषणात हलके फुलके जोक करणे आणि त्यातून हास्याची कारंजी उडवणे,  ही त्यांची शैली झाली आहे. आता त्यांनी असं काहीसं वक्तव्य केले आहे. 
 
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी तृतीयपंथींना एक सल्ला दिलाय. तुम्ही साड्या घालून नका. कारण काय तर म्हणे तुम्ही पुरुष नाही आणि महिलाही नाही. तर ते मानव आहेत. जर ते महिला नाहीत तर मग त्यांनी साडी का घालावी? असा सवाल त्यांनी केलाय. त्यांनी शर्ट पॅन्ट घालावी असाही सल्ला त्यांनी दिलाय. हैदराबादमध्ये तृतीयपंथी शिष्टमंडळासमवेत चर्चा करताना त्यांनी हे वक्तव्य केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या शिष्टमंडळाने त्यांच्यावर होणा-या अत्याचाराचं कथन केलं. सरकार त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगत. संसदेच्या आगामी अधिवेशनात तृतीयपंथींबाबतचं विधेयक संसदेत मांडण्यात येईल असं आश्वासनही आठवले यांनी दिलं. 


यातून त्यांच्या विकासाला आणि संरक्षणाला चालना मिळेल अशी आशाही आठवले यांनी व्यक्त केली.