नवी दिल्ली: देशभरातील अनुसूचित जातीच्या (एससी) विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. रामदास आठवले यांनी केंद्रीय मनुष्यबळ खात्याचे मंत्री रमेश पोखरियाल यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भाजपमध्ये ओबीसी नेते समाधानी, मलाही तिकीट कापल्याचे शल्य नाही'


यासंदर्भात 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलताना आठवले यांनी सांगितले की, रमेश पोखरियाल हे माझे चांगले स्नेही आहेत. ते आता केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री झाले आहेत. काल मी त्यांची भेट घेतली. यावेळी मी त्यांच्यासमोर मध्यप्रदेशातील एसटी (अनुसूचित जमाती) विद्यापीठाच्या धर्तीवर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावावर त्यांचा प्रतिसाद सकारात्मक होता, असे आठवले यांनी म्हटले. तसेच आठवले यांनी खासगी संस्थांमध्येही अनुसूचित जातीच्या (एससी) विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याची गरज बोलून दाखविली. 


'हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालणे म्हणजे फॅशन झालेय'