मुंबई : योग आणि आयुर्वेदाने जगभरात ओळख निर्माण केल्यानंतर पतंजलीने आता स्वतःचे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. ही क्रेडिट कार्डे पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेड (PAL) ने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या भागीदारीसह लॉन्च केली आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या RuPay प्लॅटफॉर्मवर को-ब्रँडेड क्रेडिट कार्डे ऑफर केली जातात आणि PNB RuPay Platinum आणि PNB RuPay सिलेक्ट या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.


कॅश बॅक, लॉयल्टी पॉइंट्स 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही को-ब्रँडेड कार्ड्स पतंजली उत्पादने खरेदी करण्यासाठी क्रेडिट सेवा देतात तसेच कॅश बॅक, लॉयल्टी पॉइंट्स, विमा संरक्षण आणि इतर काही वैशिष्ट्ये आहेत. कार्ड लाँच झाल्यापासून तीन महिन्यांपर्यंत, कार्डधारकांना पतंजली स्टोअरमध्ये 2500 रुपयांवरच्या खरेदीवर 50 रुपयांपर्यंत कॅशबॅग मिळणार आहे.


10 लाख रुपयांपर्यंत क्रेडिट मर्यादा


प्लॅटिनम आणि सिलेक्ट कार्डांना अपघाती मृत्यू आणि वैयक्तिक एकूण अपंगत्वासाठी अनुक्रमे रु. 2 लाख आणि रु. 10 लाखांचे विमा संरक्षण मिळेल. प्लॅटिनम क्रेडिट कार्डवर 25,000 ते 5 लाख रुपयांची क्रेडिट मर्यादा उपलब्ध असेल. 


तसेच सिलेक्ट कार्डवर 50,000 ते 10 लाख रुपयांची क्रेडिट मर्यादा उपलब्ध असेल. प्लॅटिनम कार्डवर शून्य जॉइनिंग फी असेल. मात्र, 500 रुपये वार्षिक शुल्क असेल. त्याच वेळी, सिलेक्ट कार्डवर 500 रुपये जॉइनिंग फी आणि 750 रुपये वार्षिक शुल्क असेल.