नवी दिल्ली : बाबा राम रहीम, आसाराम बापू आणि आणखी एक बाबा रामपाल या त्रिकूटांचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. ज्यात 'जेल करावेगी छोरी, जेल करावेगी', गाण्यावर हे त्रिकूट ठूमके लावताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकही मोठे चतूर आसतात. घटना कोणतीही असो, त्यात त्यांना विनोद सूचतो. बाबा राम रहीम प्रकरणातही लोकांनी विनोद शोधला.  बाबा राम रहीम, आसाराम बापू आणि बाबा रामपाल यांच्यातील समान दूवा म्हणजे या तिघांवरही बलात्काराचे आरोप आहेत. उल्लेखनीय असे की, या तिघांनाही न्यायालयाने दोषी ठरवले आहे. हाच दूवा पकडत त्यांच्यावर एक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. हा व्हिडिओ रेडिओ कसूत-फर्स्ट हरियाणवी रेडिओवरून उपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ १ लाख २० हजारांहूनही अधिक लोकांनी पाहिला तर, तब्बल ७,०८४ पेक्षांही अधिकांनी शेअर केला आहे. लोकांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे. व्हिडिओ खाली असलेल्या कमेंटबॉक्समध्ये तर कमेंटचा अक्षरश: खच पडला आहे.


दरम्यान, पंचकूलाच्या सीबीआय न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम सिंग यांना बलात्कार प्रकरणी दोषी ठरवले. त्यानंतर पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. एकट्या पंचकूलातच सुमारे २८ लाकांचा मृत्यू झाला. तर, सिरसामध्ये ३ लोकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा आता ३७वर गेला आहे. दरम्यान, दिल्ली, नोएडा आणि गाजियाबादमध्येही काही ठिकाणी हिंसाचार झाला आहे.



बाबासमर्थकांनी ट्रेन, बस आदी ठिकाणी जाळपोळ केली आहे. त्यामुळे हरियाणा आणि दिल्लीत कलम १४४ लावण्यात आले आहे. उत्तराखंड मध्येही कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तर, उत्तर प्रदेश, बागपत, गाझियाबात आदी ठिकाणी शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. काही ठिकाणी सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.