रांची :  झारखंडमध्ये योगा शिकवणाऱ्या प्रसिद्ध मुस्लिम टीचर राफिया नाज हिच्या घरावर शुक्रवारी काही लोकांनी हल्ला करून दगडफेक केली. झी न्यूजच्या शो दरम्यान हा गोंधळ झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राफिया हिला तिच्या समुदायातील काही लोकांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. धमकीत सांगितले की, ती कोणत्याही प्रकारचा योगा शिकवू शकत नाही. हे प्रकरण झारखंडचे मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव संजय कुमार यांच्यापर्यंत नेण्यात आले आहे. 


दरम्यान, या प्रकरणानंतर टीचरच्या घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. आदेशानंतर रांचीच्या एसएसपी यांनी एका पोलीस दलाला टीचरशी भेट घेण्यास पाठवले. त्यानंतर सुरक्षेसाठी दोन सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यात आले. यात एक पुरूष आणि एक महिला आहे. 


रांचीतील डोरंडा भागात राहणारी राफिया नाज योग शिकवून आपली उपजिविका चालवते. योग शिकवल्यामुळे एका फतव्यातून तिला धमकाविण्यात आले.  राफिया नाज ही आपल्या घरातील सर्वात मोठी मुगी आहे. तसेच ती स्थानिक कॉलेजमध्ये एम कॉम करत आहे. काही दिवसांपूर्वी तिने बाबा रामदेव यांच्यासोबत व्यासपीठ सादर केले आहे.