Ranjit Savarkar : विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू असलेल्या रणजीत सावरकर (Ranjit Savarkar) यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा केला आहे. रणजीत सावरकर यांनी आपल्या 'मेक शुअर गांधी इज डेड' (Make Sure Gandhi is Dead‘)या नव्या पुस्तकात अनेक खळबळजन दावे केले आहेत. महात्मा गांधी यांच्यावर गोळी कुणी चावलली याबाबत देखील सावरकर यांनी आपल्या पुस्तकात उल्लेख केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणजीत सावरकर यांनी मेक शुअर गांधी इज डेड पुस्तक लिहले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे करण्यात आले. नथुराम गोडसे ने महात्मा गांधींवर गोळी चालवली नसल्याचा दावा सावरकरांनी या पुस्तकात केला आहे. गांधीवर चालवलेल्या गोळ्या या गोडसेंच्या बंदुकीतून नव्हे तर वेगळ्या दिशेनं आल्या होत्या हा दावा पुराव्यानिशी केला असल्याचंही रणजीत सावरकरांनी सांगितले. गांधींजी यांच्या हत्या करण्यामागे कोण आहेत हे शोधण्याचं आवाहनही सावरकर यांनी केले आहे.


पुस्तकात अनेक दावे करण्यास आले आहे. महात्मा गांधी यांच्यावर नथुराम गोडसे याने गोळी चालवली नाही. महात्मा गांधी यांच्या शरिरात सापडलेल्या गोळ्या या वेगळ्या दिशेने आल्या होत्या.  ज्या गोळीने गांधी यांचा मृत्यू झाला ती गोळी नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून आलीच नव्हती असा दावा या पुस्तकातून सावरकर यांनी केला आहे. 


नथुराम गोडसे फक्त RSS चे स्वयंसेवक होते म्हणून RSS आणि हिंदू महासभेवर बंदी घातली होती. हे राम चं नाव घेऊन मोठं पाप दाबून ठेवलं होत ते या पुस्तकातून समोर येईल. रामाच्या नावाने जे पाप सुरू होत ते देखील या पुस्तकातून समोर येईल असा दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे.  


नेमकं काय आहे या पुस्तकात?


गोडसे समोर होते पण गांधीवर गोळ्या वरच्या दिशेनं मारलेल्या आहेत. नथुरामांच्या गोळ्यांनी गांधीचा मृत्यू झाला नाही. कर्नल तनेजा यांनी काळजीपूर्वक अहवाल बनवला आहे. गोडसेंचा समज झाला की मीच गोळ्या मारल्या पण ख-या गोळ्या इतरांनी मारल्या होत्या. तिथे 200 लोक होते. तिथे सुरक्षा व्यवस्था होती.


नथुराम गोडसे हे गुन्हेगार नव्हते. ते पत्रकार होते. त्यामुळे त्यांचा निशाना लागणे शक्य नव्हते. हे सगळे पुरावे पाहता गोडसेंनी मारले नाही. गांधीजी दुस-यांच्या गोळ्यांनी मेले. ते कोण होते ते तपासायला हवे. यानंतर वल्लभभाई पटेल यांचा गट संपवण्यात आला. त्यानंतर आपण ग्रेट ब्रिटन सोबत व्यापार सुरू केला. 1971 मध्ये हंटर विमान वापरले. नेहरूंनी आतबट्याचा व्यापार केला. नेहरूंना आणि ब्रिटनला याचा फायदा झाला.  माझं आवाहन आहे, सरकारनं यावर एक आयोग नेमावा. गांधी हत्येचे पुरावे दडपण्यात आले होते. त्यावर चौकशी सुरू करावी.