रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. रेल्वे मंत्रालयातील (Union Ministry of Railways) 25 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कामचुकार करणाऱ्या रेल्वे मंत्रालयातील 24 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढून टाकण्यात आलं आहे. यात काही बड्या आधिकाऱ्यांचाही समावेश आहे. गटबाजी करुन तिकीट रिझर्व्हेशन घोटाळा केल्याचाही या कर्मचाऱ्यांवर आरोप आहे. 


कामामधील ढिसाळपणा कमी करावा यासाठी या कर्मचाऱ्यांना या आधी दोन वेळा समन्सही देण्यात आलं होतं. पण त्यानंतरही कर्मचाऱ्यांकडून कामचुकारपणा केला जात होता. इतकंच नाही तर मंत्र्यांचीच कामं ऐकली जात नव्हती. 


गेल्या 10 ते 15 वर्षात या कर्मचाऱ्यांनी एक ग्रुप तयार केला होता. तो ग्रुप तोडणं गरजेचं होतं. 


त्यामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी अखेर कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. एकाच वेळी 25 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आलं आहे.