Crime News: उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊत (Lucknow) धक्कादायक घटना समोर आली आहे. लखनऊत 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन नंतर तिची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. इंदिरानगर पोलीस ठाणे क्षेत्रातील तकरोही परिसरात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर आधी बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 1 वाजता ही घटना घडली. आरोपी पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात घुसला आणि नंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने अल्पवयीन मुलीच्या डोक्यात हातोडा घातला. यानंतरही त्याने आपलं निर्घृण कृत्य थांबवलं नाही. त्याने मुलीला फासावर लटकवलं. 


पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला होता. पोलिसांनी तात्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांनी शाहिद नावाच्या तरुणावर बलात्कार आणि हत्येचा आरोप लावला आहे. वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शाहिदविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. 


परिसरात खळबळ


या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. घऱात घुसून मुलीवर बलात्कार करत हत्या केल्यानंतर परिसरातील लोक घाबरले आहेत. स्थानिकांना आपल्या सुरक्षेची भीती वाटत आहे. 


कानपूरमध्ये मतीमंद मुलीवर बलात्कार


कानपूरमध्येही मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. येथे एक तरुण शेजारी राहणाऱ्या मतीमंद मुलीवर गेल्या अनेक दिवसांपासून बलात्कार करत होता. पीडितेच्या बहिणीने आपण तरुणाला चुकीचं कृत्य करताना पाहिलं असल्याची माहिती दिली. तरुणाची चौकशी करण्यात आली असता त्याने दुष्कृत्य केल्याची कबुली दिली. मुलगी मतीमंद असल्याने ती याबद्दल फार सांगू शकली नाही. तिच्या अवस्थेचा फायदा घेत तरुण वारंवार तिच्यावर बलात्कार करत होता. याप्रकरणी कानपूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद प्रकाश तिवारी यांनी पीडित कुटुंबाशी चर्चा केली आणि नंतर आरोपीविरोधा गुन्हा दाखल केला.