नवी दिल्ली : चंदीगडमध्ये स्वातंत्र्य दिनाच्याच दिवशी धक्कादायक घटना घडली आहे. ध्वजारोहनाच्या कार्यक्रमानंतर घरी जात असतांना ८ वी च्या विद्यार्थीनीवर बलात्काराची घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली. पीडित विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ४० वर्षाच्या व्यक्तीने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.


आरोपी व्यक्तीने आधी विद्यार्थिनीचं अपहरण केलं मग तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी पीडित विद्यार्थीनीच्या माहितीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


लवकरच आरोपीला अटक करु असं पोलिसांनी म्हटलं आहे. आरोपीची ओळख अजून पटलेली नाही. पण पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.