चेन्नई : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती चेन्नईमधल्या समुद्राची... नुकताच रात्रीच्या अंधारात चेन्नईच्या समुद्रात निळा प्रकाश चकाकताना दिसला. त्यामुळे तो प्रकाश कसला होता? याची आता चर्चा सुरू झालीय. चेन्नईतल्या इंजामबक्कम आणि वसंत सागर या दोन समुद्रकिनाऱ्यावर रविवारी अशा निळ्या लाटा पाहायला मिळाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समुद्रातल्या अशा प्रकाशाला शास्त्रीय भाषेत 'नॉक्टिल्युका' असं म्हणतात. ज्यावेळी समुद्रात कार्बनडायऑक्साईडचं प्रमाण वाढतं, त्यावेळी अशा प्रकारचा निळा प्रकार समुद्रावर दिसतो, असं मत्स्य महाविद्यालयाच्या प्राध्यापक स्वप्नाजा मोहिते यांचं म्हणणं आहे. 


सौ. सोशल मीडिया

हा एक प्रकारचा प्राणीप्लवंग आहे. त्यांच्यामध्ये जैविक प्रकाश निर्माण करण्याची क्षमता असते. 


समुद्रातला हा निळा प्रकाश जलचरांसाठी घातक असतो. समुद्रातलं प्रदूषण वाढलंय, याचंही हे दिशादर्शक आहे... त्यामुळे ही निळाई नक्कीच फार काही चांगली नाही.