रतन टाटांच्या `गोवा` श्वानाने अन्न-पाणी सोडलं; पार्थिवाजवळचा `तो` व्हिडीओ... असा केला अखेरचा अलविदा
रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीचा `गोवा` या श्वानाचा पार्थिवाजवळचा व्हिडीओ व्हायरल.
Ratan Tata News : 86 वर्षांचे रतन टाटा हे अनंतात विलीन झाले. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन टाटा यांचं असं अचानक जाण अनेकांसाठी चटका लावून जाणार होतं. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे रतन टाटा यांचं श्वानांवर विशेष प्रेम होते. त्यांच्या जवळचा श्वान 'गोवा' याच्यासाठी देखील हा क्षण अतिशय कठीण होता. गोवा आणि रतन टाटा यांचा शेवटचा क्षण अतिशय भावूक करणारा आहे. पाहा तो क्षण.
'गोवा' ने दिला शेवटचा अलविदा
मुंबईत एनसीपीए लॉनच्या बाहेर रतन टाटा यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने सामान्य नागरिकही रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. या दरम्यान रतन टाटा यांचा लाडका श्वान 'गोवा' देखील तेथे उपस्थित होता. रतन टाटा यांच्या शेवटच्या भेटीसाठी व्याकूळ असलेल्या गोवा या श्वानाने त्यांच्या पार्थिवा शेजारी बसून अखेरचं अलविदा म्हटलं. गोवा त्यांच्या पार्थिवा शेजारी बसून होता तो तिथून निघण्यासाठी तयार नव्हता.
(हे पण वाचा - रतन टाटा शेवटच्या काळात वाकून का चालायचे? वृद्धापकाळात का होते अशी समस्या?)
पार्थिवा शेजारी राहिला बसून
रतन टाटा यांच्या पाळीव कुत्र्याला गोव्यातून काढण्यासाठी सतत प्रयत्न केले जात होते पण ते त्यांच्या पार्थिवापासून दूर जायला तयार नव्हते. शेवटच्या क्षणी तो मालकाकडे सतत पाहत होता. अनेक प्रयत्न करूनही गोवा आपल्या लाडक्या मालकापासून दूर जाण्यास नकार देत होता. रतन टाटा यांच्याबद्दल असे मानले जाते की त्यांना कुत्र्यांची खूप आवड होती. टाटांनी एकदा ‘बॉम्बे हाऊस’च्या बाहेर पावसापासून वाचण्यासाठी धडपडणारा एक भटका कुत्रा पाहिला होता. यानंतर त्यांनी आवारात कुत्र्यांच्या प्रवेशाबाबत विशेष सूचना दिल्या.
अन्न-पाणी सोडलं
'गोवा' ने रतन टाटा यांच्या निधनानंतर अन्न-पाणी सोडल्याचं सांगण्यात येत आहे. आपल्या मालकाचं ज्याने आपल्याला इतका जीव लावला त्यांचं असं जाणं गोव्याला सहन झालं नाही. गोवा रतन टाटा यांचा विरह सहन करु शकलेला नाही.
असं दिलं 'गोवा' हे नाव
रतन टाटा हे केवळ दिग्गज उद्योगपतीच नव्हते तर त्यांच प्राण्यांवरही अपार प्रेम होते. टाटांसाठी 'गोवा' हा केवळ पाळीव प्राणी नव्हता. टाटा समूहाचे कॉर्पोरेट मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाऊसमध्येही ते ऑफिस फेलो होते. टाटांनी गोव्याच्या प्रवासादरम्यान या भटक्या कुत्र्याची सुटका केली होती आणि त्याला मुंबईत आणण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या बचावाच्या ठिकाणावरून त्याचे नाव ठेवले.
जीवनाचा अविभाज्य घटक
'गोवा' हा टाटा घरातील इतर श्वानांसह राहणाऱ्या रतन टाटांच्या जीवनाचा प्रिय भाग बनला. टाटांनी एकदा इंस्टाग्रामवर शेअर केले की ही दिवाळी, दत्तक घेतलेल्या बॉम्बे हाऊस श्वानांसह, विशेषत: माझ्या ऑफिससोबती गोव्यासोबतचे काही हृदयस्पर्शी क्षण. प्राण्यांबद्दलचे त्यांचे प्रेम त्यांच्या संपूर्ण आयुष्यात दिसून आले, टिटो आणि टँगो हे दोन श्वान देखील त्यांच्या कुटुंबाचा भाग होते.