मुंबई : जे लोक सरकारच्या गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशनचा लाभ घेत आहेत. अशा लोकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने ही योजना काही काळापूर्तीच मर्यादित ठेवली होती. परंतु याच्या तारखेत सरकारकडून वाढ करण्यात आली होती. ही वाढ मार्च 2022 पर्यंत होती. परंतु त्यानंतर या तारखेत वाढ करणार असल्याचे यंदाच्या झालेल्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणतेही आश्वासन दिलेले नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत समाविष्ट असलेल्या 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्यासाठी केंद्र सरकारने मार्च 2020 मध्ये ही योजना सुरू केली होती. महामारीच्या काळात गरजू लोकांच्या अडचणी कमी करणे हा त्याचा उद्देश होता.


बजेटमध्ये यावर नक्की सांगितलं गेलं?


गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सरकारकडून प्रति व्यक्ती 5 किलो अतिरिक्त अन्नधान्य मोफत दिले जात आहे. हे NFSA अंतर्गत 2-3 रुपये प्रति किलो दराने सामान्य अन्नधान्य वाटपामध्ये येत नाही ये त्याच्या व्यतिरिक्त आहे.


मार्च 2022 नंतर गरीब कल्याण अन्न योजनेणध्ये वाढ केला जाईल का? असा प्रश्न निर्मला सितारमण यांना पत्रकार परिषदेत विचारले असता, त्या म्हणाल्या, "मला बजेटमध्ये मांडलेल्या मुद्यां व्यतिरिक्त मला काहीही बोलायचे नाही."


म्हणजेच याचा अर्थ असा की, त्यांनी बजेटमध्ये हा मुद्दा विचारात घेतला नाही. म्हणजेच कदाचित ही योजना मार्च 2022 नंतर बंद केली जाऊ शकते.


मार्च 2022 पर्यंत मोफत धान्य


PMGKAY योजना 2020-21 मध्ये केवळ तीन महिन्यांसाठी सुरू करण्यात आली होती. नंतर सरकारने त्यात जुलै-नोव्हेंबरपर्यंत वाढ केली. कोविड संकट कायम राहिल्यानंतर त्याला पुन्हा मे आणि जून 2021 मध्ये लागू केले गेले आणि चौथ्या टप्प्यांतर्गत जुलै ते नोव्हेंबर 2021 पर्यंत पाच महिन्यांसाठी वाढविण्यात आले. नंतर या योजनेचा कालावधी डिसेंबर 2021 ते मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आला आहे.


या योजनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही https://pmmodiyojana.in/pradhanmantri-ration-subsidy-yojana/ या लिंकवर जाऊन माहिती मिळवू शकता.