Ration Card News : देशातील असंख्य रेशन कार्डधारकांसाठी  (Ration Card) महत्त्वाची बातमी आहे. रेशन दुकानावर मिळणाऱ्या अन्नधान्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. देशातील रेशन कार्डधारकांना एप्रिल 2023 पासून या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे. बदलानंतर 60 लाख रेशनधारकांना चांगल्या दर्जाचं आणि पोष्टिक असं अन्नधान्य मिळणार आहे.  राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदाद्वारे (NFSA) मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2023 पासून देशातील सर्व कार्डधारकांना फोर्टीफाईड तांदुळ (Fortified Rice) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे रेशनधारकांना दर्जेदार अन्नधान्य मिळणार आहे. (ration card news card holders get fortified rice from 1 april 2023 in country know details)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्य तांदळाचं फोर्टीफाईड तांदळात रुपांतर करण्यासाठी सरकारकडून 11 कंपन्यांचं पॅनेल तयार करण्यात आलंय. सध्या ही सुविधा हरिद्वारमधील कार्डधारकांना मिळतेय. मात्र उर्वरित कार्डधारकांना एप्रिल 2023 पर्यंत वाट पहावी लागणार आहे. 


तसंच रास्त भाव दुकानांमध्ये तांदूळ-गहूव्यतिरिक्त इतर पौष्टीक वस्तूही देण्यात येणार आहेत. गरजू आणि सर्वसामान्यांचा विचार करुन सरकार याबाबत विचार करतेय. हे सर्व अन्नधान्य परवडणाऱ्या दरात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


फोर्टीफाईड तांदुळ म्हणजे काय?  


साधारण तांदळाच्या तुलनेत फोर्टीफाईड तांदुळ अधिक पौष्टिक असतं. साधारण तांदळात खनिजं, प्रोटिन आणि व्हिटामीनचं ठराविक प्रमाण मिश्रीत केलं जातं. मात्र फोर्टीफाईड तांदळात लोह, व्हीटामीन, कॅल्शिनय आणि बी  12 सारख्या पोषक तत्त्वांचा समावेश असतो.