रेशन कार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, केंद्र सरकारकडून मोठा बदल
रेशन कार्डधारकांसाठी (Ration Card Holders) महत्त्वाची बातमी आहे.
नवी दिल्ली : रेशन कार्डधारकांसाठी (Ration Card Holders) महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्याकडे पिवळं रेशनकार्ड आहे आणि मोफत रेशन मिळत असेल, तर ही बातमी आवर्जून वाचा. केंद्र सरकारने रेशनच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या निर्णयांची अंमलबजावणी जून महिन्यापासून होणार आहे. (ration card news central government give big decision on yellow ration card holders know details)
गहूऐवजी तांदूळ मिळणार
केंद्र सरकार राज्यांमध्ये रेशनकार्ड धारकांना मोफतात अन्नधान्य पुरवते. यामध्ये गहू आणि तांदूळ याचा समावेश असतो. हे मोफतात मिळणार अन्नधान्य पीएम गरीब कल्याण योजनेअंतर्गत देण्यात येतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या योजनेनुसार आता गहूऐवजी आता तांदूळ मिळणार आहे. असं झाल्यास रेशन कार्डधारकांना गहूपेक्षा तांदूळ अधिक प्रमाणात मिळतील.
या 3 राज्यात गहू मिळणार नाही
मोदी सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे ते सप्टेंबर या कालावधीत वाटप करण्यात येणारा गव्हाचा कोटा कमी केला आहे. यामुळे यूपी, बिहार किंवा केरळमध्ये गहू मोफत वितरणासाठी उपलब्ध होणार नाही.
दिल्ली, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्येही गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे. या राज्यांमध्ये कार्डधारकांना गहू कमी आणि तांदूळ जास्त मिळेल. उर्वरित राज्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
नक्की कारण काय?
यूपी-बिहारमधील गव्हाचे वाटप संपुष्टात येण्याचे कारण गव्हाच्या खरेदीत घट झाल्याचे सांगितलं जातंय. या अतिरिक्त वाटपादरम्यान सुमारे 55 लाख मेट्रिक टन तांदूळ वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अन्न सचिवांनी दिली. हा बदल केवळ फक्त PMGKAY साठी असणार आहे. यामुळे काही राज्यांमध्ये पूर्वीपेक्षा कमी गहू आणि जास्त तांदूळ वाटप होईल.