Ravindra Jadeja Wife: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी आमदार रिवाबा जाडेजा (Rivaba Jadeja) शुक्रवारी अॅक्शन मोडमध्ये दिसल्या. कोणतीही पूर्वकल्पना न देता रिवाबा जाडेजा पालिका अधिकाऱ्यांसह सीसी रोडचं बांधकाम पाहण्यासाठी पोहोचल्या होत्या. दरम्यान यावेळी रस्त्याच्या कामाची गुणवत्ता पाहून त्या चांगल्याच संतापल्या. रस्त्यावर सर्वांसमोरच त्यांनी ठेकेदाराला खडे बोल सुनावले.


रस्तेकामात घोटाळा होत असल्याची मिळाली होती माहिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिवाबा जाडेजा जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांना शहरातील गोकुळ नगर क्षेत्रातील मथुरा नगरमध्ये बांधकाम होत असलेल्या सीसी रोडच्या कामकाजात घोटाळा सुरु असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर त्या तात्काळ पालिका अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या.



आमदार आल्याचं पाहताच ठेकेदार आश्चर्यचकित


आमदार रस्त्याचं कामकाज पाहण्यासाठी आले आहेत हे पाहताच ठेकेदारासह रस्त्याचं कामकाज करणारे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी त्यांनी रस्ते कामात सुरु असलेल्या अनियमितेतची चौकशी केली. यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी रस्त्याचं काम बंद केलं. 


स्थानिकांकडून रिवाबा जाडेजा यांचं कौतुक


रिवाबा जाडेजा यांनी यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नियनानुसार रस्त्याचं कामकाज केलं जाईल असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं आहे. दुसरीकडे स्वत: आमदार काम पाहण्यासाठी आले असल्याने स्थानिकांनी आनंद व्यक्त केले. रस्ते कामकाजासंबंधी आमदार गंभीर असल्याने स्थानिकांनी कौतुक केलं आहे.