मुंबई : बँक खातेदारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. आता केवायसीसाठी खातेदारांना प्रत्यक्ष बँकेत जाण्याची गरज नाही. डिजिटल पद्धतीने केवायसी बँक खात्यात अपडेट होणार आहे. रिझर्व बँकेंची डिजिटल केवायसीला मंजुरी मिळाली आहे. त्याद्वारे केंद्र सरकारने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक नियमात केलेले बदल समाविष्ट करणे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईलवरील व्हिडिओ कॉलद्वारेही ग्राहकाला केवायसी करता येणार आहे. यासाठी आधार क्रमांक आणि एक मोबाईल व्हिडिओ कॉल इकतंच बँक खातं उघडण्यासाठी पुरेसं आहे. डिजिटल केवायसीच्या दिशेनं रिझर्व्ह बँकेनं हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. गुरूवारी संध्याकाळी रिझर्व्ह बँकेनं नियमातील बदलाची अधिसूचना काढली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसंच दुर्गम भागातील नागरिकांना या  सुविधेचा विशेष लाभ होणार आहे.


केवायसीकरता बँकेत स्वतः येऊन कागदपत्रे जमा करणे हे थांबवण्यासाठी सेंट्रल बँकेने ग्राहकांना लाईव्ह फोटो वापरण्याची संधी दिली आहे. त्यासोबतच अधिकृत कागदपत्रे देखील जोडणे अनिवार्य आहेत. तसेच व्हिडिओ कॉलद्वारे कागदपत्रे दाखवतात ग्राहकाला geo-tagging म्हणजे ग्राहकाने त्याच देशातून हे करत असल्याचे स्पष्ट होण्याकरता भौगोलिक टॅगिंग करणं महत्वाचं आहे. 


आरबीआयकडून फक्त केवायसीकरताच ऑनलाईन सेवा पुरवली असं नाही. आरबीआयकडून आता डिजिटल स्वाक्षरी केलेली कागदपत्रे, ग्राहकाच्या डिजिटल लॉकर खात्यात दिलेली कागदपत्रे जे अकाऊंट ओपनिंग करतात लागू शकतात. तसेच ग्राहकांना त्यांची वैयक्तिक कागदपत्रे ऑनलाइन संचयित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याला 'डिजी-लॉकर' असे संबोधले जाते. 


'नवीन वर्षाची सुरूवात खूप चांगली झाली,' असं वर्कऍपचे संस्थापक रूद्रजीत देसाई यांनी म्हटलंय. पुढे देसाई म्हणतात की,'या सोईमुळे नागरिकांना मदत होईलच पण त्यासोबत देशाची आर्थिक व्यवस्था वाढवण्यासाठी देखील मदत होणार आहे. 'देसाई यांनी बँकेला व्हिडिओ केवायसी हा पर्याय दिला होता.