आरबीआयनं या बँकेचं लायसन्स रद्द केलं
आरबीआयनं या बँकेला दणका दिला
मुंबई : आरबीआयनं अलवर को-ऑपरेटिव्ह बँकेचं लायसन्स रद्द केलं आहे. बँकेनं खातेदारांचे पैसे परत न केल्यामुळे आरबीआयनं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. ही बँक आता पुन्हा उभी राहिल असं वाटत नाही, त्यामुळे बँकेचं लायसन्स रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचं स्पष्टीकरण आरबीआयनं दिलं आहे. लायसन्स रद्द करण्याचा निर्णय ५ जुलैपासून लागू होणार आहे.
११ बँका पीसीए यादीमध्ये
खराब वित्तीय स्थितीमुळे आरबीआयनं ११ बँकांना प्रॉम्प्ट अॅक्शन लिस्ट(पीसीए)मध्ये टाकण्यात आलं आहे. या बँका त्यांची एटीएमही बंद करत आहेत. या बँकांच्या यादीमध्ये इंडियन ओव्हरसीज बँक आणि कॅनरा बँक यासारख्या दिग्गज बँकांचाही समावेश आहे. या यादीमध्ये असलेल्या बँकांनी एका वर्षात आत्तापर्यंत १६३५ एटीएम बंद केल्या आहेत. इंडियन ओव्हरसीज बँक, देना बँक, इलाहाबाद बँकही त्यांची एटीएम बंद करत आहे.
इंडियन ओव्हरसीज बँकेकडून सर्वाधिक एटीएम बंद
आरबीआयनं ११ बँकांना पीसीए यादीमध्ये टाकलं आहे. यामध्ये ७ बँकांनी त्यांची एटीएम कमी केली आहेत. यामध्ये सेंट्रल बँक, अलाहाबाद बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॉर्पोरेशन बँक आणि यूको बँक यांचा समावेश आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेनं सर्वाधिक एटीएम बंद केली आहेत. या बँकेची परिस्थिती सुधारण्यासाठी आरबीायनं त्यांच्या लेंडिगवरही काही निर्बंध आणले आहेत.
इंडियन ओव्हरसीज बँकेनं त्यांची १५ टक्के एटीएम बंद केली आहेत. यामुळे बँकेच्या एटीएमची संख्या ३ हजार झाली आहे. एप्रिल २०१७ साली ही संख्या साडे तीन हजार होती. यूको बँकेनं ७.६ टक्के एटीएम बंद केली आहेत.