Digital currency RBI: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक बदल होत असतात, पण नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल होणार आहे. RBI स्वतःचा डिजिटल रुपया लॉन्च  करणार आहे. यानंतर नोटा छापल्या जातील का? जुन्या नोटा चालतील की नाही? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. स्वतःचे डिजिटल चलन असणार्‍या मोजक्या देशांमध्ये भारत देखील असेल. 1 नोव्हेंबर रोजी RBI स्वतःचा डिजिटल रुपया जारी करणार आहे. मात्र, सध्या हे केवळ पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरु करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिजिटल चलन आणण्याची चर्चा अर्थसंकल्पाच्या घोषणेच्या वेळीच झाली होती. तेव्हापासून डिजिटल चलन कधी येणार याची प्रतीक्षा होती. आता लोकांची प्रतीक्षा संपली आहे. पायलट प्रोजेक्टमध्ये सामान्य लोक हे आभासी चलन खरेदी करु शकतात का? हे चलन कसे असेल? त्याची किंमत किती असेल? या चलनाची काही हमी आहे की नाही. याबाबत अधिक जाणून घ्या.


डिजिटल रुपया कधी येणार?


रिझर्व्ह बँक एकूण 9 बँकांसह हे चलन सुरु करणार आहे. मोठ्या पेमेंटसाठी डिजिटल रुपयाचा वापर केला जाईल. बँकेच्या म्हणण्यानुसार, त्याचा वापर सरकारी रोख्यांच्या खरेदी आणि विक्रीवर सेटलमेंटसाठी केला जाईल. महिनाभर किरकोळ व्यवहारांसाठीही याचा वापर करता येईल.     


तुम्ही डिजिटल रुपया वापरु शकता का?  


RBI ने 7 ऑक्टोबर 2022 रोजी सांगितले होते की, ते लवकरच डिजिटल रुपयासाठी पायलट प्रोजेक्ट सुरु करणार आहे. या पायलट प्रोजेक्टमध्ये डिजिटल मनीचा वापर मर्यादित लोकांसाठी ठेवण्यात आला आहे. या पथदर्शी प्रकल्पाच्या निकालांच्या आधारे तो मोठ्या प्रमाणावर बाजारात आणला जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, डिजिटल रूपयांच्या सुरुवातीमुळे बँकांचा व्यवहार खर्च कमी होईल. 


यानंतर नोटा छापल्या जातील का?


सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. अफवांचा बाजारही दिसून येत आहे. RBI Digital Rupeeबाबत अनेक प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहेत. पण तुम्हाला अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. डिजिटल चलन आणल्यानंतरही आरबीआय नोटा छापणे सुरुच ठेवणार आहे आणि बाजारातील रोखीची व्यवस्था सुरु राहणार आहे. ती संपणार नाही आणि सरकारने अद्याप असे काही सांगितलेले नाही.    


आभासी चलन कसे खरेदी करावे 


जसे 10, 20, 50, 100, 500, 2000 च्या नोटा आहेत. डिजिटल रुपया देखील त्याच मूल्यात  (डिनॉमिनेशन) राहील. किती डिजिटल रुपये ठेवता येतील? त्याची मर्यादा अद्याप ठरलेली नाही. डिजिटल रुपया तुमच्या खिशात राहणार नाही. त्याचा वापर आभासी जगात केला जाईल. या चलनामागे आरबीआयची गॅरंटी असेल, म्हणजेच ती बिटकॉइनसारखी नसेल. ते खरेदी करणे पूर्णपणे सुरक्षित असेल.