नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत नोटांचे लूक आणि डिझाईनमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यातच आता १०० रुपयांच्या नोटासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरबीआयने २००० रुपये आणि २०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. त्यासोबतच ५०० रुपये आणि ५० रुपयांच्या नोटही बाजारात नव्या रंग-रुपात आणल्या. या नोटांच्या डिझाईन आणि लूक खूपच वेगळा आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरबीआय लवकरच १०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहे. या नोटांची छपाई एप्रिल महिन्यात सुरु होणार आहे.


जुन्या नोटा चलनात राहणार


नव्या १०० रुपयांच्या नोटा चलनात आणणार आहेत. नव्या नोटांची साईज बदलण्यात येणार नाहीये. त्यामुळे नव्या नोटा अगदी सहजपणे एटीएम मशीन्समध्ये सेट होतील. खास बाब म्हणजे १०० रुपयांच्या जुन्या नोटाही चलनात स्विकारल्या जाणार आहेत. नव्या नोटा चलनात आल्यानंतर हळू-हळू जुन्या नोटा परत घेतल्या जातील.