RBI ची मोठी भेट, आता NEFT आणि RTGS वर नाही आकारलं जाणार शुल्क
आरबीआयचा ग्राहकांना मोठा दिलासा
नवी दिल्ली : भारतीय रिजर्व्ह बँकेने आज गुरुवारी अनेक मोठे निर्णय घेतले. आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.25 टक्के कपात केली. दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता ऑनलाईन पैसे ट्रांसफर करण्यासाठी घेतला जाणार चार्ज देखील बंद करण्यात आला आहे. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर (एनईएफटी) आणि रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) वर लागणारे शुल्क आता आकारला जाणार नाही. काही महत्त्वाच्या बँकांनंतर इतर बँकाही आता गहे शुल्क आकारणार नाहीत. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
आरबीआयच्या या निर्णयानंतर सामन्य नागरिकारांना याचा मोठा फायदा होणार आहे. एकीकडे होम लोन, कार लोन आणि इतर लोनवरील ईएमआय तर कमी होईलच पण ऑनलाईन पैसे पाठवताना लागणारं शुल्क देखील आता आकारण्यात येणार नाही.
बँकांनी ग्राहकांचा फायदा करुन दिला पाहिजे. त्यामुळे बँकांनी हे शुल्क घेऊ नये अशी सूचना आरबीआयने केली आहे. एका आठवड्यात हा निर्णय़ सर्व बँकांमध्ये लागू होईल.
NEFT आणि RTGS शुल्क
आतापर्यंत 2 लाख ते 5 लाखाच्या आरटीजीएसवर 25 रुपये आणि टाईम वेरिंग चार्ज घेतला जात होता. तर 5 लाखापेक्षा अधिकच्या रकमेवर 50 रुपए आणि टाईम वेरिंग चार्ज आकारण्यात येत होता. 8 ते 11 तासापर्यंत बँक कोणचाही चार्ज घेत नव्हता. पण 11 ते 13 तासापर्यंत बँक २ रुपये आणि 13 ते 16.30 तारसापर्यंत 5 रुपये आणि 16.30 पेक्षा अधिक तासांवर 10 रुपए अतिरिक्त चार्ज वसूल केला जात होता.
NEFT म्हणजे काय ?
नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर (एनईएफटी) ही राष्ट्रीय व्यवहार प्रणाली आहे. ज्याच्या माध्यमातून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पैसे ट्रांसफर करु शकतो. देशभरात कोणालाही तुम्हाला पैसे पाठवता येतात. 2 तासात पैसे हे तुम्हाला हव्या त्या व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या अकाऊंटमध्ये टाकता येतात.
एनईएफटीच्या माध्यमातून 50 हजारापर्यंत पैसे ट्रांसफर करता येतात. विशेष प्रकरणांमध्ये बँक याची सीमा वाढवू शकते. सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे काम होतं. शनिवारी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हे काम चालतं.
RTGS काय असते?
रीयल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच आरटीजीएस ही देखील पैसे ट्रान्सफर करण्याची प्रणाली आहे. आरटीजीएसमध्ये पैसे लगेच ट्रांसफर केले जातात. आरटीजीएसचा वापर मोठे व्यवहार करण्यासाठी केला जातो. आरटीजीएसमध्ये कमीत कमी दोन लाख रुपय ट्रांसफर करता येतात. फंड प्राप्त होताच बँक अर्धा तासाच्या आत हे पैसे ट्रांसफर करते. आरटीजीएसमध्ये सकाळी 9.30 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पैसे ट्रांसफर करता येतात. शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पैसे ट्रांसफर करता येतात.