RBI Digital Currency: आरबीआयने शुक्रवारी, 7 ऑक्टोबर 2022 रोजी डिजिटल रुपयावर एक कॉन्सेप्ट नोट जारी केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) डिजिटल चलनाच्या फ्रेमवर्कवर काम करत आहे. आज सेंट्रल बँकेने सांगितले की, लवकरच ई-रुपये पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. या डिजिटल रुपयाच्या काही विशिष्ट वापरासाठी हा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. आरबीआयचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी तयार केलेल्या कॉन्सेप्ट नोटमध्ये असे सांगण्यात आले आहे की, पायलट प्रोजेक्टची व्याप्ती जसजशी वाढत जाईल, तसतशी आरबीआय डिजिटल रुपयाची विशिष्ट वैशिष्ट्ये आणि फायदे याबद्दल माहिती देत ​​राहील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात डिजिटल चलनाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली होती. या आर्थिक वर्षात RBI ब्लॉकचेन आणि अशा तंत्रज्ञानाचा वापर करून CBDC आणणार आहे. डिजिटल चलनाच्या जगात आरबीआयचे हे मोठे पाऊल आहे. क्रिप्टोकरन्सी कराच्या कक्षेत आणल्यानंतर आरबीआय आभासी चलनाच्या जगात एक पर्याय देईल.



ई-रुपयेवर RBI काय म्हणाले?


कॉन्सेप्ट पत्रात असे सांगण्यात आले आहे की, आरबीआय CBDC लाँच करण्यापूर्वी त्याची वैशिष्टे आणि उणीवा देखील तपासत आहे. सध्या टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी करण्याचे धोरण आखले जात आहे. सध्या, पायलट प्रकल्प अनेक टप्प्यात चालतील, त्यानंतर अंतिम स्वरूप दिल जाईल. यासोबतच, सध्याच्या आर्थिक व्यवस्थेत अडथळा निर्माण न करता आरबीआय त्याच्या विविध उपयोगांवर लक्ष ठेवेल.


RBI ने CBDC ची व्याख्या कशी केली आहे?


आरबीआयचे म्हणणे आहे की, सीबीडीसी देखील एक कायदेशीर निविदा आहे, जी केंद्रीय बँक डिजिटल स्वरूपात जारी करेल. ही सॉवरेन पेपर करंसीसारखी असेल. परंतु ते सध्याच्या चलनासह अदलाबदल करण्यायोग्य असेल आणि देयकाचे माध्यम, कायदेशीर निविदा आणि मूल्याचे सुरक्षित भांडार म्हणून मंजूर केले जाईल.