मुंबई : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास आज पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहे. रेपो रेटमध्ये अर्धा टक्का वाढ होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचप्रमाणं कोरोनाच्या काळात जाहीर करण्यात आले
सैल पतधोरण आता आज पूर्णपणे मागे घेतलं जाण्याची घोषणाही गव्हर्नर करतील अशी शक्यता अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. 


हीच महागाई नियंत्रणात आणण्याच्या हेतूनं व्याजदरात दोन टप्प्यात 0.90 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. आज पुन्हा एका अर्धा टक्क्याची वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


व्याज दरवाढ आणि महागाई या दोघांमुळेही आर्थिक विकासदराला खीळ बसते. त्यामुळे आज गव्हर्नर आर्थिक वाढीच्या दरांचे अपेक्षित आकडेही जाहीर करतील. त्याकडेही सर्वांचं लक्ष राहील. जगाच्या तुलनेत देशांतर्गत महागाई काही प्रमाणात नियंत्रणात असली, तरी गेल्या तीन व्याजदरवाढींमुळे लोकांचे गृहकर्जाचे हप्ते लक्षणीय प्रमाणात वाढलेत.


आजच्या दरवाढीनंतर सामान्यांचा खिसा आणखी हलका होणार आहे. आज होणा-या व्याजदरवाढीचा खरा उद्देश महागाई नियंत्रणात आणणं हा आहे. तो सफल झाला तर, भविष्यात म्हणजे दसरा दिवाळीच्या वेळी सामान्यांना दिलासा मिळेल असंही तज्ज्ञांचं मत आहे.