नवी दिल्ली : रिजर्व बैंक ऑफ इंडिया (RBI) ने आयडीबीआय बँकेच्या नाव बदलण्याच्या प्रस्थावाचे समर्थन केले नाही. सूत्रांनी सांगितल्यानूसार, आयबीडीआय बँकेच्या संचालक मंडळाने गेल्या महिन्यात बँकेचे नाव बदलून एलआयसी आयडीबीआय बँक किंवा एलआयसी बँक करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अधिग्रहणानंतर, संचालक मंडळाने बँकेचे नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. 


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँकेचे नाव बदलण्याच्या विरोधात आहे. संचालक मंडळाने बँकेचे नाव बदलून एलआयसी आयडीबीआय बँक या नावाला प्राधान्य दिले होते. त्याचप्रमाणे एलआयसी बँक लिमीटेड असा दुसरा पर्याय देण्यात आला होता. कोणत्याही बँकेचे नाव बदलण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या व्यतिरिक्त कॉर्पोरेट कार्य मंत्रालय, शेअरधारक, शेअर बाजार इत्यादींच्या परवानगीची आवश्यकता असते. जानेवारीमध्ये सार्वजनीक विमा कंपनी एलआयसीने आयडीबीआय बँकेचे ५१ टक्के हिस्स्यांवर अधिग्रहण पूर्ण केले.