अरे देवा! RBI च्या एका निर्णयामुळं आता Gold Loan मिळणारच नाही?
Reserve Bank of India Latest News : देशातील आर्थिक व्यवहार आणि सर्व बँकांसह आर्थित संस्थांवर नजर ठेवून असणाऱ्या आरबीआयनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
IIFL Finance Limited Gold Loan : एखादी महत्त्वाची गोष्ट किंवा एखाद्या अतिशय महत्त्वाच्या कामासाठी ज्यावेळी पैशांची अडचण भासते तेव्हा कर्जाचा पर्याय निवडून अपेक्षित मदत मिळवण्याकडेच अनेकांचा कल दिसतो. घर घेण्यापासून शिक्षण ते अगदी लग्नसमारंभ किंवा इतर काही कारणांसाठी हे कर्ज घेतलं जातं. यामध्ये Gold Loan हा पर्यायही बरीच मंडळी निवडताना दिसतात.
आपल्याकडे असणारं सोनं गरज पडल्यास कर्जाऊ देत त्याऐवजी कर्ज घेत आर्थिक गरजा भागवण्याचा मार्ग देशात आतापर्यंत अनेकांनीच अवलंबला असेल. किंबहुना ही सुविधा अनेक संस्था आणि बँकांकडूनही दिली जाते. पण, आता मात्र आरबीआयनं अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं यामध्ये लक्ष घातलं असून, Gold Loan देणाऱ्या एका बड्या कंपनीविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. ज्यामुळं भविष्यातील काही समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँकेनं Gold Loan देणाऱ्या IIFL Finance Ltd या कंपनीवर सदर कर्ज देण्यास बंदीची कारवाई केली आहे. ज्यामुळं आता या संस्थेकडूनही सोन्यावर कर्ज देण्याची सुविधा तातडीनं थांबवण्यात आली आहे. सोन्याच्या शुद्धतेची पडताळणी करण्याच्या प्रक्रियेमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यामुळं आरबीआयनं ही कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामुळं आता अनेकांनाच Gold Loan मिळणं अशक्य झालं आहे.
हेसुद्धा वाचा : Gold Rate : वर्षअखेरीस सोन्याचे दर 75 हजारांवर? आज 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायत 'इतके' पैसे
आरबीआयचा हा निर्णय फक्त गोल्ड लोन संबंधित व्यवहारांपुरताच मर्यादित असून, आर्थिक सुविधांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या IIFL Finance कडून ग्राहकांना इतर प्रकारचे कर्ज आणि आर्थिक सुविधा मात्र नियमाप्रमाणंच देण्यात येणार असून, यावर RBI च्या कारवाईचा कोणताही परिणाम होताना दिसणार नाही. इतकंच नव्हे तर, IIFL कडून सुवर्ण कर्ज वसुलीची प्रक्रियाही सुरु ठेवण्याचे निर्देश आरबीआयनं दिले आहेत.
IIFL कंपनी करते तरी काय?
IIFL फाइनान्स ही आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या अग्रगणी कंपन्यांपैकी एक आहे. IIFL हो फायनान्स, IIFL फायनान्स लिमिटेड आणि IIFL ओपन फिनटेक अशा सहकारी कंपन्यांच्या माध्यमातून ही कंपनी कर्ज आणि तत्सम आर्थिक सुविधा ग्राहकांना पुरवते. सध्या या कंपनीच्या 500 विविध शहरांमध्ये 2600 हून अधिक शाखा कार्यरत आहेत.
दरम्यान, सध्या या कंपनीकडून सुवर्ण कर्जावर बंदी घालण्याची कारवाई आरबीआयनं केली आहे. 31 मार्च 2023 पर्यंत आरबीआयनं IIFL च्या आर्थिक स्थितीसंदर्भात निरीक्षण केलं होतं. पण, त्यामध्ये काही त्रुटी आरबीआयला आढळून आल्या. गेल्या काही महिन्यांपासून आरबीआयकडून या त्रुटींवर कंपनीतील वरिष्ठ व्यवस्थापन मंडळाशी चर्चाही करण्यात आली पण, कोणताही सकारात्मक बदल दिसला नसल्यामुळं अखेर आरबीआयनं ही कारवाई केल्याचं स्पष्ट केलं.