मराठी उमेदवारांनो ही संधी सोडू नका, आरबीआयमध्ये नोकरीची संधी
RBI ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 303 ग्रेड बी पदांची भरती करत आहे.
मुंबई : RBI भर्ती 2022: सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 303 ग्रेड बी पदांची भरती करत आहे. या पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल आहे. उमेदवारांनी 18 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीविषयी सविस्तर जाणून घ्या.
आरबीआयने भरतीसाठी अधिसुचना जारी केली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइट rbi.org.in ला भेट द्या. उमेदवारांनी अचुक माहितीची नोंद करणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज बाद केला जाऊ शकतो.
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ऑनलाइन अर्जासाठी स्टेप्स संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी देय तारखेपूर्वी अर्ज करावा .
अर्ज प्रक्रियेच्या महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख - 28 मार्च 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 एप्रिल 2022
भरती तपशील
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या RBI एकूण 303 पदांसाठी भरती घेणार आहे.
ज्यामध्ये अधिकारी ग्रेड बी जनरलसाठी 238 पदे,
अधिकारी ग्रेड बी DEPR साठी 31 पदे
ग्रेड बी DSIM साठी 25 रिक्त जागा
व्यवस्थापक राजभाषा पदासा 6 पदे आहेत.
अधिक तपशीलाच्या माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर (rbi.org.in) पाहू शकतात.