नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेनं अर्थात आरबीआयनं रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के कपात जाहीर केलीय. त्यामुळे आता हा दर ६.५० टक्क्यांवरून कमी होऊन ६.२५ टक्क्यांवर पोहचलाय. आरबीआयच्या या निर्णयामुळे तुमचं गृहकर्ज आणि वाहन कर्जाचा हफ्ता कमी होणार आहे. रेपो रेट घटल्यामुळे बँकांकडून कर्ज घेणं सर्वांसाठीच स्वस्त झालंय... आणि तुमचा ईएमआयही कमी झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमचा ईएमआय किती कमी होईल हे जाणून घेण्यासाठी तुमच्या कर्जाची मूळ रक्कम, व्याज दर आणि किती वर्षांसाठी हे कर्ज घेतलं गेलंय या माहितीच्या आधारे ईएमआयचं गणित तुम्हाला करून पाहता येईल. रेपो रेट कमी झाल्यामुळे तुमची बचतच होणार आहे. 


गृह कर्जाच्या हफ्त्यात बदल 


गृह कर्ज वर्ष  सद्य हफ्ता नवा हफ्ता वार्षिक बचत 
३० लाख रुपये  २५ वर्ष २४,४६० रुपये  २३,९५५ रुपये ६०६० रुपये

नोट : एसबीआयच्या सद्य गृह कर्जावर व्याज दर ८.६५ च्या आधारावर (०.२५ % कमी झालेल्या नव्या व्याजदरासोबत ईएमआयचं गणित)


वाहन कर्जाच्या हफ्त्यात बदल


वाहन कर्ज वर्ष  सद्य हफ्ता नवा हफ्ता वार्षिक बचत 
५ लाख रुपये ५ वर्ष १०,४२८ रुपये १० ३६७ रुपये ७३२ रुपये 

नोट : एसबीआयच्या सद्य वाहन कर्जावर व्याज दर ९.२० च्या आधारावर (०.२५ % कमी झालेल्या नव्या व्याजदरासोबत ईएमआयचं गणित)


कर्जदारांना दिलासा


रेपो रेट कमी झाले याचाच अर्थ आता बँका जेव्हाही रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेतील तेव्हा त्यांना नव्या दरानुसार हे पैसे उपलब्ध होतील. आरबीआयकडून स्वस्त दरात पैसे उपलब्ध झाल्यामुळे बँका आपल्या ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देऊ शकतात. रेपो रेट वाढले तर तुमच्या ईएमआयमध्येही वाढ होते.


रेपो रेट म्हणजे काय?


रेपो रेट म्हणजे ज्या दरानं बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं. साहजिकच ग्राहकांना बँकांकडून महागात कर्ज मिळणार... किंवा रेपो रेट कमी झाला म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कमी दरात पैसा उपलब्ध होणार आणि त्याचा फायदा ग्राहकांनाही घेता येणार.