मुंबई : आरबीआयने सोमवारी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 13 सहकारी बँकांवर (RBI Penalty on 13 Cooperative Banks) कारवाईचा बडगा उचलला आहे. आरबीआयने या 13 बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. आरबीआयने या बँकांना 50 हजार ते 4 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने सर्वाधिक दंड हा 'श्री कन्याका नागरी सहकारी बँक' चंद्रपूर या बँकेला लगावला आहे. आरबीआयने या बँकला 4 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. (rbi reserved bank of india penalized to 13 cooperative bank)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरबीआयने अर्बन को-ऑपरेटिव बँक, सातारा आणि इंदूर प्रीमियर को-ऑपरेटिव बँक, इंदूर या दोन्ही बँकांना 2-2 लाख रुपयांचा दंड लावलाय. अनेक नियमांचं उल्लंघन केल्याने पाटण नागरिक सहकारी बँक, पाटण आणि तुरा अर्बन को-ऑपरेटिव बँक, मेघालय या बँकांना 1 लाख 50 हजार रुपयांचा दंड सुनावलाय.


नागरिक सहकारी बँक मर्यादित, जगदलपूर, जिजाऊ वाणिज्यिक सहकारी बँक, अमरावती, इस्टर्न एंड नॉर्थ इस्ट फ्रंटियर रेल्वे को ऑप बँक, कोलकाता, जिल्हा सहकारी केंद्रीय बँक लिमिटेड छतरपूर, नागरिक सहकारी बँक लिमिटेड रायगड, जिल्हा सहकारी केंद्रीय बँक मर्यादित, बिलासपूर आणि जिल्हा सहकारी केंद्रीय बँक मर्यादित, शहडोल यां बँकांचाही दंडात्मक कारवाई करण्यात आल्या बँकांमध्ये समावेश आहे.


खातेधारकांचं काय?


बँकांनी विविध नियमांचं उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे.  बँकांनी ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही कराराशी किंवा व्यवहाराशी त्याचा काहीही संबंध नाही, असं आरबीआयने स्पष्ट केलंय.