RBI UDGAM portal for Unclaimed Deposits: बँकेत खातं सुरु केल्यानंतर त्या खात्यामध्ये विविध स्तरांवर आर्थिक व्यवहार केले जातात. अनेकदा एकाहून अधिक खातीही बँकेत सुरु करून त्यामध्ये पैशांची विभागून गुंतवणूक आणि ठेव सुरु केली जाते. मात्र काही प्रसंग असे येतात जेव्हा अनावधानानं किंवा काही तांत्रिक बाबींमुळं बँकेत असणारे पैसे काढणं शक्य होत नाही. अशा वेळी नेमकं काय करावं? तुमचे किंवा तुमच्या ओळखीतील एखाद्या व्यक्तीचे पैसे बँकेत अडकून राहिल्यास ते परत कसे मिळवायचे हाच प्रश्न तुम्हालाही पडतोय का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजी-आजोबांचं किंवा सुरु करून विस्मरणात गेलेलं एखादं बँक खातं लक्षात आलं आणि त्यात असणारे पैसे आता नेमके काढायचे कसे? या प्रश्नाचं उत्तर आता आरबीआयनंच दिलं आहे. RBI नं या कामासाठी नुकतंच एक पोर्टल लाँच केलं आहे, जिथं तुम्ही जुने आणि दावा न केलेले थोडक्यात अनक्लेम्ड डिपॉजिट्स (Unclaimed Deposits) काढू शकता. अर्थात खात्यातून पैसे काढू शकता. या प्रक्रियेअंतर्गत आरबीआयकडून 30 बँकांची यादी जारी करण्यात आली आहे. त्यामुळं यामध्ये तुमचं खातं तर नाही, हेसुद्धा एकदा पाहून घ्या. 


आरबीआयनं का घेतला हा निर्णय? 


आरबीआयनं जारी केलेल्या यादीमध्ये अॅक्सिस, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक या आणि अशा अनेक बँकांची नावं आहेत. जिथून ग्राहकांना UDGAM portal च्या माध्यमातून अनक्लेम्ड डिपॉजिट्समधील पैसे काढण्याची सुविधा प्राप्त असेल. येत्या काळात या यादीमध्ये आणखी काही बँकांची नावं जोडली जाण्याची शक्यता आहे. आरबीआयनं जारी केलेल्या ‘अनक्लेम्ड डिपॉजिट्स गेटवे टू एक्सेस इंफॉर्मेशन’ (UDGAM) या पोर्टलमध्ये जाऊन तुम्ही सर्वप्रथम नावनोंदणी करणं अपेक्षित असेल. जिथं तुम्हाला खात्यात कैक वर्षांपासून असणारी जमा रक्कम परत केली जाणार आहे. या पोर्टलच्य मदतीनं तुम्ही एकाच वेळी, एकाच ठिकाणहून एकाहून अधिक बँकांमधील खाती शोधून अनक्लेम्ड डिपॉजिट्सची रक्कम मिळवू शकता. 


हेसुद्धा वाचा : फक्त 'सिडको'च्याच हाती कोकणच्या विकासाच्या चाव्या! शिंदे सरकारचा मोठा निर्णय



अनक्लेम्ड डिपॉजिटमध्ये किती रक्कम? 


देशातील सर्वोच्च बँक असणाऱ्या आरबीआयच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला लाँच करण्यात आलेल्या पोर्टलवर 30 बँकांची नावं समाविष्ट करण्यात आली असून, या बँकांकडे एकूण रकमेतील अनक्लेम्ड डिपॉजिटची जवळपास 90 टक्के रक्कम जमा आहे. काही खासगी माहिती आणि तपशीलाची पूर्तता केल्यानंतर तुम्ही ही रक्कम मिळवण्यास पात्र असाल. देशातील विविध बँकांमध्ये मार्च 2023 पर्यंत साधारण 42,270 कोटी रुपये इतके अनक्लेम्ड डिपॉझिट असल्याचं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.