मुंबई : RBI to fine Banks if ATM run out of Cash: ज्या बँकांच्या एटीएममध्ये रोख रक्कम नाही त्यांच्यावर रिझर्व्ह बँक आता कठोर कारवाई करणार आहे. 1 ऑक्टोबर 2021 पासून जर बँकेच्या एटीएममध्ये रोख रक्कम संपली असेल तर बँकांना दंड भरावा लागू शकतो. आरबीआयने मंगळवारी याबाबत माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिकृत निवेदनात आरबीआयने म्हटले आहे की, बँकांच्या एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसल्याचा आढावा घेण्यात आला आहे आणि असे दिसून आले आहे की एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसल्यामुळे सामान्य लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.


यासाठी आरबीआयने बँक, व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटरला एटीएममध्ये रोख रकमेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि त्याची प्रणाली मजबूत करण्यास सांगितले आहे. जर बँका एटीएममध्ये रोख रक्कम सुनिश्चित करू शकत नसतील तर त्यांना विहित दंड भरावा लागेल. ही योजना 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होईल


योजनेचे उद्दिष्ट


RBI आरबीआयने म्हटले आहे की, बँकांनी नेहमी एटीएमद्वारे सामान्य जनतेला रोख रकमेसाठी हा प्रवाह कायम राखला पाहिजे.


किती दंड होईल


RBIकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही एटीएममध्ये महिन्यामध्ये 10 तासांपेक्षा जास्त काळ रोख रकमेची कमतरता असल्यास 10,000 रुपये दंड आकारला जाईल. व्हाईट लेबल एटीएमच्याबाबतीत, (डब्ल्यूएलए)  त्या विशिष्ट डब्ल्यूएलएची रोख आवश्यकता पूर्ण करणाऱ्या बँकेकडून दंड आकारला जाईल. बँक, आपल्या विवेकबुद्धीनुसार, WLA ऑपरेटरकडून दंड वसूल करू शकते.