मुंबई : आमीर खानचा '3 इडिएट्स' हा सिनेमा लक्षवेधी ठरला. शैक्षणिक पद्धत आणि पालकांना पाल्यावर असलेला एक दबाव या सिनेमातून अधोरेखित झाला. या सिनेमात अभिनेता आमीर खानने 'फुंत्सूक वांगडू' हे पात्र साकारलं. हे पात्र काल्पनिक नसून खऱ्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे ज्याने समाजासमोर एक आदर्श ठेवला. शैक्षणिक बदल करून शिक्षणाची नवी आणि खरी पद्धत जगासमोर आणली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बालदिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ता आणि तज्ञ सोनम वांगचुक यांच्या 'अमर उजाला' या वेबसाइटने संवाद साधला. वांगचुक यांनी आपल्या लेखात जगभरातील शैक्षणिक पद्धतीवर भाष्य केलं. आताचे विद्यार्थी हे मनाने खचत चालले आहेत. तसेच शिक्षण पद्धतीमध्ये 3 महत्वाचे बदल करणे आवश्यक आहेत, असं वांगचुक म्हणाले. 


पारंपरिक शिक्षण पद्धती ही चुकीची नाही. पण ती पद्धत गुरूकुलवर आधारित होती. जी प्रत्येक दृष्टीकोनातून उत्कृष्ठ आहे. पण मधल्या काही काळात ही पद्धत दूर निघून गेली. आता जी शिक्षण पद्धती आहे ती अगदी पुस्तकी पद्धत आहे. इथे शिक्षण हे पुस्तकी झालं आहे. 


शिक्षणात या तीन गोष्टींमध्ये बदल महत्वाचा 


पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये 3 गोष्टी महत्वाच्या होत्या. वाचणे, लिहिणे आणि काही गणिती पद्धती. आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करून ती पध्दत समजून घेण्याकडे असायला हवी. शिकवलेलं ज्ञान हे मन, डोकं आणि हात यावर कायम असायला हवं. आताच्या शिक्षणपद्धतीने कौशल्य आणि मन मजबुत करणं महत्वाचं आहे. 


आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी शिकत आहेत. पण ते रचनात्मक नाहीत. आताची शिक्षण पद्धत ही एकमेकांवर आधारित आहे. त्यांच्यात सतत स्पर्धा सुरू असते. यामुळे विद्यार्थ्यांचे मन कमकुवत होत चालले आहे. 


शिक्षण पद्धती अशी असायला हवी, ज्यामध्ये विद्यार्थी कुशल आणि खुल्या विचारांचा झाला पाहिजे. अशा शिक्षण पद्धतीला वांगचुक 'एज्युकेशन ऑफ हार्ट' असं म्हणतात. आपल्याला अशा समाजाची आवश्यकता आहे जो एकमेकांप्रती सहानुभूतीने पाहतो. जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तो पैसे कमावण्यासाठी नका करू. एखाद्या समस्येवर उपाय शोधण्याच्या दृष्टीकोनातून तो व्यवसाय करा. त्यातून तुम्हाला सर्वाधिक समाधान मिळेल. यासाठी लोकांनी आपला विचार बदलणं गरजेचं आहे.