Indian Rupee : गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची (Indian Rupee) मोठी घसरण झाल्याचं बाजारातील आकडेवारीवरून दिसून येत आहे. गुरुवारी रुपयामध्ये तब्बल 83 पैशांचं अवमूल्यन झालं. शुक्रवारी रुपया 30 पैशांनी रुपया पडला. त्यामुळे अमेरिकन डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपयाचं (Rupee) मूल्य आता थेट 81.09 इतकं झालं आहे.  (record fall in the rupee Finance Minister Nirmala Sitharaman give reply)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पडझडीबाबत बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी जगातील इतर चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपया मजबूत झाला आहे असं म्हटलं आहे.  भारतीय चलनाच्या (Indian Rupee) स्थितीबद्दल सर्वच स्तरावर चिंता व्यक्त केली जात असताना, सीतारामन (Nirmala Sitharaman) म्हणाल्या की भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि अर्थ मंत्रालय रुपयाच्या स्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.


“इतर देशांच्या तुलनेत भारतीय रुपयाचं अवमूल्यन डॉलरच्या तुलनेत कमी झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणाऱ्या घडामोडींमुळे कुठलं चलन जर कमीत कमी प्रभावित झालं असेल, तर तो रुपया आहे. या बाबतीत आपण चांगली कामगिरी केली आहे”, असं सीतारमण यांनी म्हटलं आहे.


रुपयाच्या (Indian Rupee) घसरणीबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, सध्याच्या घसरणीच्या काळात डॉलरच्या तुलनेत इतर चलनांच्या स्थितीचा अभ्यास करण्याची गरज आहे.



शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 81.09 च्या पातळीवर  होता. गेल्या काही महिन्यांपासून रुपयाच्या मूल्यात सातत्याने घसरण होत आहे. गुरुवारी रुपया एकाच दिवसात 83 पैशांनी घसरला, जी गेल्या सात महिन्यांतील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे.


रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावामुळे डॉलरच्या तुलनेत इतर चलनांची स्थिती कमकुवत झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेसह अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात वाढ केल्याने चलनांवर दबाव वाढला आहे.