10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी
सरकारी नोकरीची सुवर्ण संधी
नवी दिल्ली : सिक्योरिटी असिस्टेंट/एग्जीक्यूटिव या पदासाठी नोकरी करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. इंटेलिजेंस ब्यूरो (IB) ने सिक्योरिटी असिस्टेंट/एग्जीक्यूटिव पदांसाठी भरती आणली आहे. या पदासाठी 10वी पास असणं आवश्यक आहे. एकूण 1054 पदांसाठी ही भरती होणार आहे.
वय मर्यादा
या पदासाठी जास्तीत जास्त 27 वर्ष वय असले पाहिजे. SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्ष आणि ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षाची सूट आहे.
परीक्षेच्या माध्यमातून निवड
अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षेच्या माध्यमतून निवड होणार आहे. तीन टप्प्यामध्ये ही परीक्षा असणार आहे. पहिला पेपर ऑब्जेक्टिव टाईप असणार आहे. दुसरा पेपर डिस्क्रिपटिव टाइप असणार आहे. त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती होणार आहे. यातून उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.
50 रुपये परीक्षा फी
या पदासाठी अर्ज करण्यासाठी mha.gov.in आणि ncs.gov.in या वेबसाईटला भेट द्या. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही यासाठी अर्ज करु शकता. या पदासाठी अर्ज करताना खुला आणि ओबीसी वर्गासाठी 50 रुपये परीक्षा फी असणार आहे. तर एससी, एसटी, एक्स सर्विसमन आणि महिला उमेदवारांनी कोणतीही फी नाही आहे.
शेवटची तारीख
10 नोव्हेबर 2018 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 13 नोव्हेंबर 2018 ही परीक्षा फी भऱण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे.