मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये टेलिव्हिजनवरील रेड लेबल चहाच्या जाहिरातीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, आता या जाहिरातीवरून रेड लेबलला टीकेला सामोरे जावे लागत आहे. ही जाहिरात हिंदूविरोधी असल्याचा आक्षेप काहीजणांनी घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर #BoycottRedLabel हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या जाहिरातीमध्ये एक हिंदू युवक मुस्लीम कारागीराने तयार केलेली गणपतीची मूर्ती खरेदी करण्यास नकार देतो. यानंतर चहा पिताना तरुण या कारागिराशी गप्पा मारतो. तेव्हा त्याचे मनपरिवर्तन होते, अशी या जाहिरातीची संकल्पना आहे. 


मात्र, अनेकजण रेड लेबलच्या या जाहिरातीवर संतापले आहेत. प्रत्येकवेळी हिंदूधर्मीयांनाच सहिष्णूतेचे धडे का शिकवले जातात, असा प्रश्न या लोकांना उपस्थित केला आहे. कोल्हापूर, सोलापूर आणि फलटणमध्ये रेड लेबलविरुद्ध तक्रारही दाखल करण्या आल्याचे समजते.