Married Life Tips: आपला जीवनसाथी निवडणं हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो. प्रेमविवाहात एकमेकांना ओळखण्यात तशी अडचण येत नाही. प्रेमविवाहाचा एक फायदा म्हणजे लग्नापूर्वी जोडीदारासोबत पुष्कळ वेळ घालवता येतो. त्यामुळे एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी जाणता येतात. तसेच लग्नानंतर होणाऱ्या कुरबुरींची जबाबदारीही केवळ त्या दोघांचीच असते. पण अरेंज्ड मॅरेजमध्ये जोडीदाराची माहिती असणं गरजेचं आहे. कारण भविष्यात जोडीदारासोबत आयुष्य घालवणं सोपं जातं. लग्न निश्चित करण्यापूर्वी आपल्याला जोडीदाराला भेटण्याची दोन तीन वेळा संधी मिळते. अशा वेळी तुमच्याकडे जोडीदारासोबत काही गोष्टी शेअर करणं गरजेचं असते. आज आम्ही तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत कोणत्या गोष्टी शेअर करायला हव्यात? याबाबत सांगणार आहोत. लग्नापूर्वी जोडीदाराशी या मुद्द्यांवर नक्की बोला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कौटुंबिक प्रथा


प्रत्येक कुटुंबाची स्वतःची परंपरा आणि प्रथा असते. अशा परिस्थितीत लग्नाआधी, मुलगी असो की मुलगा, त्यांनी एकमेकांच्या कौटुंबिक परंपरा, श्रद्धा, संस्कार इत्यादींबद्दल बोलणं गरजेचं आहे. विशेषतः नोकरी करणाऱ्या मुलींनी याबाबत समजून घेणं गरजेचं आहे. कुटुंबातील श्रद्धा आणि परंपरांना ते किती वेळ देऊ शकतील याबद्दल त्यांनी त्यांच्या जोडीदाराशी बोलले पाहिजे.


पैसा आणि करिअर


विवाहापूर्वी आर्थिक समस्यांबद्दल बोलणे देखील खूप महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या भावी जोडीदाराशी करिअर आणि फायनान्सशी संबंधित गोष्टी आणि भविष्यातील स्वप्नांबाबत बोलणं गरजेचं आहे. विशेषत: मुलींना करिअरच्या दृष्टीने पुढे काय करायचे आहे आणि या कामात त्यांचा पार्टनर त्यांना कसा पाठिंबा देईल याबद्दल बोलणे खूप महत्वाचे आहे.


नोकरी आणि वेळेबद्दल


या गोष्टींवरून पती-पत्नीमध्ये अनेकदा तणाव निर्माण होतो. नोकरी किंवा वेळेचा प्रश्न अनेकदा भांडणासाठी कारणीभूत ठरतो.  काही ठिकाणी दिवसा आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करावे लागते.  भविष्यात तुम्हाला रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करावे लागेल.त्यामुळे लग्नापूर्वी या विषयावरही चर्चा व्हायला हवी.