मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) चे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनी या राज्यात जवळपास 5 हजार करोड रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक पेट्रोलियम आणि खुल्या बाजारात केली जाणार आहे. कोलकातामध्ये आयोजित केलेल्या दोन दिवशीय बंगाल वैश्विक व्यापार शिखर संमेलनात अंबानी यांनी ही माहिती दिली. पश्चिम बंगाल या राज्यात मोबाइल फोन आणि सेट टॉपबॉक्स यांची निर्मिती करून इलेक्ट्रॉनिक उद्योगाला प्रोत्साहित केले जाणार आहे. 


दूरसंचार व्यवहारात 15,000 करोड रुपयांची केली गुंतवणूक 


मुकेश अंबानी यांनी सांगितले की, आरआयएलने राज्यात दूरसंचार व्यवहारात 15 हजार करोड रुपयांची गुंतवणूक केली आहे. यासाठी 4,500 करोड रुपयांची प्रतिबद्धता केली होती. अंबानी म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अनुकूल वातावरण निर्माण होईल अशी आशा आहे. या संमेलनात आर्सेलर मित्तलचे लक्ष्मी निवास मित्तल, जेएसडब्ल्यूचे सज्जन जिंदल. फ्यूचर समूहचे किशोर बियानी, कोटक समूहाचे उदय कोटक आणि आर पी संजीव गोयनका समूहाचे चेअरमन संजीव गोयनका देखील सहभागी होते.