Ambani Family Details : रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविषयी संपूर्ण देशात कुतूहल पाहायला मिळतं. या कुटुंबातील नातेसंबंध, त्यांचा व्यवसाय, त्यांच्याकडे आयोजित केला जाणारा एखादा कार्यक्रम किंवा मग आणखी काही. जिथं विषय अंबानींचा (Ambani Family) येतो, तिथं कुतूहल आणि त्यानंतर होणारा प्रश्नांचा भडिमार आलाच. अशा या कुटुंबाचा भक्कम पाया रचला तो म्हणजे मुकेश अंबानी यांचे वडील, धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांनी. पत्नी कोकिलाबेन अंबानी यांच्या साथीनं धीरुभाईंनी आपल्या मुलांना उत्तम संस्कार आणि शिक्षण देत स्वाभिमानानं जगण्याचा मूलमंत्र दिला. 


नातवंडांशी धीरुभाईंचं खास नातं.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फक्त मुलंच नव्हे, तर घरातील बाळगोपाळांसोबत म्हणजेच नातवंडांसोबतही त्यांचं खास नातं. आकाश, अनंत, ईशा या तिघांवरही त्यांचा प्रचंड जीव. अनिल अंबांनीच्या मुलांवरही धीरूभाई अंबानी यांनी प्रचंड प्रेम केलं. पण, ईशा या आपल्या पोतीवर मात्र त्यांची विशेष माया. 


हेसुद्धा वाचा : श्रीमंती, प्रसिद्धी असूनही नीता अंबानींपुढे दु:खाचा डोंगर; एका आशेच्या किरणानं आयुष्याला कलाटणी


2018 मध्ये ईशा अंबानी (isha ambani) आणि आनंद पिरामल यांच्या प्री वेडिंग फंक्शनचा एक व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला. जिथं खुद्द ईशाच्या आजी, कोकिलाबेन (Kokilaben Ambani) यांनीच हा किस्सा सांगितला. ईशा जेव्हा अवघ्या 6 महिन्यांची होती तेव्हा तिचे आजोबा तिची प्रचंड काळजी घ्यायचे. तिचा चेहरा पाहिल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नव्हती, तिचा चेहरा पाहिल्याशिवाय ते चहासुद्धा प्यायचे नाहीत असं त्या म्हणाल्या होत्या. 


वडिलांनी ईशावर सोपवली मोठी जबाबदारी... 


रिलायन्स (Raliance industry) उद्योग समुहाला एका अपेक्षित स्तरावर नेऊन ठेवल्यानंतर मुकेश अंबानी यांनी अतिशय योग्य वेळी त्यांच्या व्यवसायांची धुरा पुढच्या पिढीवर सोपवली. दोन्ही मुलांसोबतच त्यांनी ईशावर अर्थात लाडक्या लेकीवरही मोठी जबाबदारी सोपवली. सध्याच्या घडीला ईशा रिलायन्स रिटेलच्या संचालकपदी असून, ती अतिशय शिताफीनं तिचं काम बजावताना दिसते. 



ईशा आणि आकाश (Akash Ambani) अंबानी ही मुकेश- नीता अंबानींची (Nita Ambani) जुळी मुलं. (IVF) आयव्हीएफ पद्धतीनं त्यांचा जन्म झाला होता. ईशा वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी चर्चेत आली, जेव्हा तिच्या नावाचा समावेश फोर्ब्सच्या सर्वाधिक श्रीमंत वारसदारांच्या यादीत करण्यात आला होता. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणारी ईशा एक पियानो आर्टिस्टही आहे. 2013 मध्ये तिनं येल यूनिवर्सिटीतून साइकोलॉजी आणि साउथ एशियन स्टडीजमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केलं. सध्या ती मातृत्त्वाची भूमिका बजावत असून, आपल्या बाळांच्या संगोपनावर लक्ष देताना दिसते.