नवी दिल्ली: गव्हर्नन्स नाऊने 2021 या वर्षासाठी व्हिजनरी अवॉर्ड्स 2021 जाहीर केले आहेत. सुप्रसिद्ध अँकर आणि पत्रकार सुधीर चौधरी यांची मोस्ट पॉप्युलर फेस न्यूज (हिंदी) साठी निवड झाली आहे. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू 29 जानेवारी रोजी वर्च्युअल पद्धतीने आयोजित कार्यक्रमात 7 विविध कॅटेगिरीमध्ये निवडलेल्या विजेत्यांना सन्मानित करतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुधीर चौधरी हे 'झी न्यूज'चे मुख्य संपादक 
सुधीर चौधरी हे Zee News, WION आणि Zee Business चे CEO आणि मुख्य संपादक असून ते दीर्घकाळापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. सध्या, ते 'झी न्यूज'चा प्राइम टाइम न्यूज शो 'डेली न्यूज अँड अॅनालिसिस' (DNA) सादर करतात. हा देशातील क्रमांक 1चा न्यूज शो आहे


90 च्या दशकात पत्रकारितेची सुरूवात करणाऱ्या सुधीर चौधरी यांनी 2001 च्या संसदेवर हल्ला आणि कारगिल युद्धासह अनेक महत्त्वाच्या घटना कव्हर केल्या आहेत. सुधीर चौधरी यांना त्यांच्या उत्कृष्ट पत्रकारितेसाठी रामनाथ गोएंका पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.


7 विविध कॅटेगिरीमध्ये विजेत्यांची निवड 
व्हिजनरी अवॉर्ड्स 2021 साठी सुधीर चौधरी यांच्या व्यतिरिक्त, 
बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर यांना मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल, 
आशिष चौहान(MD, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नियामक) आणि आर्थिक क्षेत्रात योगदानाबद्दल, 
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना COVID-19 परिस्थिती हाताळण्याबाबत सर्वोत्कृष्ट प्रशासक म्हणून,
राजदीप सरदेसाई यांची, इंडिया टुडे ग्रुप कन्सल्टिंग एडिटर फॉर मोस्ट पॉप्युलर फेस न्यूज (इंग्रजी) आणि 
भाजप नेते शहजाद पूनावाला यांची प्रभावी राजकीय प्रवक्ता म्हणून निवड करण्यात आली आहे.


गव्हर्नन्स नाऊ हे अधिकारी ब्रदर्सद्वारा चालवलेले मासिक आहे. जे सार्वजनिक धोरण आणि प्रशासनाच्या विश्लेषणासाठी ओळखले जाते. सध्या, गव्हर्नन्स नाऊ वेबसाइट आणि पाक्षिक म्हणून उपलब्ध आहे.