नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक १० रुपयाची नवी नोट लवकरच चलनात आणणार आहे. या नोटेचं छायाचित्र झी २४ तासच्या हाती आलंय. चॉकलेट ब्राऊन रंगामध्ये असलेली ही नोट महात्मा गांधी मालिकेमधली सर्वात नवी नोट ठरणार आहे. 


नोटेवर भारतीय संस्कृतीचे प्रतिक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटेच्या मागच्या बाजुला भारतीय संस्कृतीच्या प्रतिकांपैकी एक असलेल्या कोणार्कच्या सूर्यमंदिराचं छायाचित्र असेल. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारनं या नव्या डिझाईनला मान्यता दिल्यानंतर १ अब्ज चलनी नोटा छापून तयार आहेत. 


या नोटा प्रथम चलनात


२००५ नंतर १० रुपयांच्या नोटेमध्ये प्रथमच बदल करण्यात येतोय. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सरकारनं ५० रुपयांची नव्या डिझाईनमधली नोट चलनात आणली होती. त्यावेळी देशात प्रथमच २०० रुपयाची नोटही आणली गेली. 


८ नोव्हेंबर २०१६ ला १००० आणि ५०० च्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं ५०० रुपयांची नव्या डिझाईनमधली नोट आणि २००० रुपयांची नोट चलनात आणली होती.