Currency Note Latest News: नोटबंदीच्या (demonetisation) निर्णयानंतर केंद्र सरकारनं देशातील चलनाशी संबंधित काही असेही निर्णय घेतले त्यातच आणखी एक माहिती नुकतीच समोर आली आहे. ही बातमी आहे 500 रुपयांच्या नोटेसंदर्भातली (500 rupee note). त्यामुळं तुमच्याकडेही 500 रुपयांची नोट असेल तर, ही बातमी नक्की वाचा. कारण ही बातमी तुम्हाला धक्का देऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

500 रुपयांच्या 2 प्रकारच्या नोटा 


सध्या दैनंदिन चलनांमध्ये 500 रुपयांच्या 2 नोटा पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये फारच साम्य दिसून येत आहे. यातली एक नोट ही बनावट असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं तुम्हाला कोणी या खोट्या नोटेनं गंडा घालण्याआधी नेमकी ती ओळखायची कशी हे नक्की पाहा. 


व्हिडीओनुसार खरी नोट कोणती? (Viral Video Fact check)


नेमकी कोणत्या प्रकारची नोट खरी, हे या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलं आहे. PIB नं याच व्हिडीओला Fact Check केल्यानंतर नेमकं सत्य उघड झालं आहे. व्हिडीओनुसार ज्या 500 रुपयांच्या नोटेवर हिरवी पट्टी गव्हर्नरच्या सहीजवळून जात असेल किंवा गांधीजींच्या फोटोच्या अगदी जवळ असेल तर ती अजिबात स्वीकारू नये. 


Bank Privatisation: 'ही' सरकारी बँक होणार Private; केंद्राच्या निर्णयामुळे लाखो खातेधारकांवर परिणाम 


तुम्हीही या असल्या कोणत्यातरी व्हिडीओवर विश्वास ठेवत असाल, तर आताच थांबा. कारण हा व्हिडीओच बनावट आहे. या दोन्ही प्रकारच्या नोटा खऱ्या असून, त्यांना स्वीकृती प्राप्त आहे. त्यामुळं यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता नाही असं आरबीआयनंही (RBI) स्पष्ट केलं आहे. 


कोणत्याही व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका 


सध्या बरेच व्हायरल मेसेज आपल्याला धक्का देतात. पण, अशा मेसेजना बळी न पडता तो कोणालाच चुकूनही फॉरवर्ड करु नये. तुम्हाला अशाच कोणत्याही मेसेज किंवा माहितीला फॅक्ट चेक करायचं असल्यास https://factcheck.pib.gov.in/ या लिंकवर क्लिक करा. याव्यतिरिक्त +918799711259  या क्रमांकावर किंवा pibfactcheck@gmail.com या ईमेल आयडीवर सदर प्रकरणांचा व्हिडीओ पाठवा.