२०० रुपयांची नोट एटीएममध्ये मिळणार नाही?
नोट बंदीनंतर १००० आणि ५०० रुपयांच्या चलनातून बाद झाल्या. त्यानंतर दोन हजार आणि ५०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्यात. आता २०० रुपयांची नोट चलनात येणार आहे. मात्र, ही नोट एटीएममध्ये मिळणार नाही, अशी शक्यता आहे.
मुंबई : नोट बंदीनंतर १००० आणि ५०० रुपयांच्या चलनातून बाद झाल्या. त्यानंतर दोन हजार आणि ५०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्यात. आता २०० रुपयांची नोट चलनात येणार आहे. मात्र, ही नोट एटीएममध्ये मिळणार नाही, अशी शक्यता आहे.
दरम्यान, २००च्या नव्या नोटेची चर्चा आहे. ही नोट कशी दिसणार, ती कधी येणार आदी चर्चा असताना ही नोट एटीएममध्ये मिळणार नाही. या नव्या नोटेची उत्सुकता आहे. मात्र ही नोट सामान्यांना एटीएममध्ये मिळणार नाही. ती फक्त बँकांमध्ये आणि बाजारात उपलब्ध असेल.
२००० आणि ५०० रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्यानंतर देशभरातल्या सर्व एटीएममध्ये मशिन आणि त्यांचे सॉफ्टवेअर अपडेट करावे लागले होते. त्याचप्रकारे आता येणाऱ्या नव्या २००च्या नोटांसाठी एटीएममधली यंत्रणा आणि सॉफ्टवेअर अपडेट करावे लागणार आहेत. त्यामुळे ही नोट तात्काळ एटीएममध्ये मिळणार नाही.
२०० ची नोट जरी आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जारी झाली, तरी ती लागलीच एटीएममध्ये उपलब्ध होणार नाही. किमान काही महिने तरी ही नोट फक्त बँकेतच उपलब्ध असेल.
२०० रुपयांची नवी नोट कशी असेल, याविषयी अनेक प्रकारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र निळ्या रंगाची नोटच खरी असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.