रिटर्न मशीन | या स्टॉकने 10 वर्षात दिला तब्बल 8800 टक्के रिटर्न, दिग्गज ब्रोकर्सकडून खरेदीचा सल्ला
शेअर बाजारातील काही स्टॉक्सने गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती केले आहे. फायनान्स सेक्टरमधील तशाच एका स्टॉकने गेल्या 10 वर्षात तब्बल 8800 टक्के रिटर्न दिला आहे
मुंबई : शेअर बाजारातील काही स्टॉक्सने गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती केले आहे. फायनान्स सेक्टरमधील तशाच एका स्टॉकने गेल्या 10 वर्षात तब्बल 8800 टक्के रिटर्न दिला आहे. बजाज फायनान्स (Bajaj Finance)या शेअरने ही कमाल केली आहे. इतकी जबरजस्त कमाई दिल्यानंतर देखील हा शेअर आणखी तेजीत येण्यासाठी तयार आहे.
25 हजारचे झाले 22 लाख
गेल्या 10 वर्षांचा विचार केल्यास या शेअरचा भाव 69 रुपयांवरून 6162 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजेच शेअरची किंमत 90 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. म्हणजेच 25 हजार रुपये 10 वर्षापूर्वी लावले असते. तर आज त्याची व्हॅल्यु 22 लाख रुपये असती.
कोविड नंतरही नफ्यात वाढ
बजाज फायनान्सने चालु आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 1002 कोटींचा नफा कमावला आहे. त्यामुळे दिग्गज ब्रोकिंग हाऊसेस बजाज फायनान्सच्या शेअरबाबतीत सकारात्मक आहेत.
शेअरखानने या शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला असून 7000 चे लक्ष ठेवले आहे. ब्रोकरेज हाऊसेसचे म्हणणे आहे की, कोविड असूनही बजाज फायनान्सचा वार्षिक उत्पन्न 12 टक्क्यांनी वाढले आहे.
मोतिलाल ओसवाल यांनी या शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला असून यासाठी 6700 चे लक्ष ठेवले आहे.