ज्या शेतात सुरु झाली मामी आणि भाच्याची प्रेम कहाणी, त्याच शेतात मामाचा झाला गेम... काय आहे हे प्रकरण, जाणून घ्या
मामीचं भाच्यासोबत अफेर, मामाला कळताच या प्रकरणाला वेगळंच वळण, नक्की असं काय घडलं?
Crime News : विवाहित महिलेने अवैध संबंधांसाठी आपल्या प्रियकराच्या साथीने पतीला संपवलं आहे. कोणाला संशय येऊ नये म्हणून पत्नीने पोलीस स्टेशनमध्ये पती बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. मात्र तपासानंतर वेगळंच सत्य समोर आलं.
नेमकं काय आहे प्रकरण?
चंद्रकला या महिलेचं सुनील नावाच्या तरूणासोबत अफेर होते. सुनील शेत मजूरीचं काम करायचा तर चंद्रकला ही शेतात चारा आणण्यासाठी यायची. यादरम्यान दोघांचं सूत जुळलं, एकाच समाजाचे असल्याने सुनील हा मृत कृष्णलालला मामा म्हणायचा.
हळू-हळू सुनील चंद्रकलाच्या घरी जाऊ लागला आणि त्यांचे संबंध आणखी घनिष्ठ झाले. दोघांची प्रेम कहानी शेतातून घरापर्यंत पोहोचली. मात्र, त्यांचं अफेर कृष्णलालपासून जास्त दिवस लपून राहिलं नाही. यावरून कृष्णलाल आणि चंद्रकला यांच्यात भांडणं होऊ लागली.
असा रचला हत्येचा कट
कृष्णलालला दोघांच्या अफेरबाबत माहिती झालं असलं तरीसुद्धा चंद्रकला सुनीलला भेटण्यासाठी शेतात जायची. यावरून कृष्णलाल आणि चंद्रकला दोघांमध्ये सारखीच भांडणं होऊ लागली. या रोजच्या भांडणाला कंटाळलेल्या चंद्रकलाने आपल्या प्रियकरासोबत मिळून कृष्णलालला मारून टाकायचं ठरवलं आणि त्यांनी तसा प्लान देखील आखला.
या दोघांनी कृष्णलालला शेतात काम करताना संपवलं आणि त्याचा मृतदेह शेतात पुरला. तसेच कोणाला संशय येऊ नये म्हणून चंद्रकलाने त्याच दिवशी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
असा झाला प्रकरणाचा उलगडा
बेपत्ता प्रकरणाचा तपास सुरू असताना बेपत्ता कृष्णालालची बहीण विमलाने आपला भाऊ कृष्णाचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला. याबाबत माहिती होताच फोन बंद करून चंद्रकला आणि सुनील दोघेही गायब झाले. त्यावरून पोलिसांचा संशय आणखी बळावला.
शहर पोलिसांनी दुसरे पथक तयार करून चंद्रकला आणि सुनीलचा शोध सुरू केला. दोघे पंजाबमधील अबोहर पोलीस स्टेशन हद्दीतील वजीरपुरा गावातील एका शेतात सापडले. तेथे चंद्रकला सुनीलसोबत मजुरीचं काम करत होती.
पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर दोघांनी खुनाचा खळबळजनक खुलासा करताना 14 जानेवारी रोजी कृष्णलालची हत्या करून मृतदेह शेतात पुरल्याचं मान्य केलं. आरोपीच्या सांगण्यावरून शहर पोलिसांनी मातीच्या ढिगाऱ्यात मृतदेह पुरलेल्या ठिकाणी खड्डा खोदल्यानंतर कृष्णलालचा मृतदेह त्यांना सापडला. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहे.