भागलपूर : तुम्ही घेत असलेला १०० रु. किलो किंमतीचा बसमती ३० रु. किलोच्या तांदळाच्या दर्जाचा असेल तर ? हो असे प्रकरण नुकतेच बिहारमध्ये उघडकीस आले आहे. बिहारमधील भागलपूरमध्ये ३० रु. किलोने विकल्या जाणाऱ्या तांदळात दिड रुपयाची पावडर मिसळून ते १०० रुपयांमध्ये विकले जात असल्याचे घबाड समोर आले आहे. हा बेकायदेशीर व्यवसाय उघड झाला आहे. पश्चिम बंगाल, दिल्ली, पाटणा आणि रांची येथून तांदूळ घेऊन व्यापाऱ्यांतर्फे मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि गुजरातसह संपूर्ण देशात वितरीत केले जात आहेत.


अशी होते भेसळ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमध्ये तांदळात भेसळ केल्यानंतर ते कतरनी आणि बासमतीच्या नावावर देशभरात विकले जात आहे.
बिहार पूर्व चेंबर ऑफ कॉमर्सच्या मते, बासमती तांदूळ इथे  उपलब्ध नाही आणि कतरनीचे पीक क्षेत्र खूपच कमी आहे.
तरीही या ठिकाणाहून दर महिन्याला ३ हजार क्विंटल बासमती आणि ५००० क्विंटल कतरनी तांदळाची निर्यात केली जाते.
दरवर्षी ७० कोटीचा काळा पैसा या व्यवसायातून कमावला जातो.


असा बनतो नकली बासमती 


बासमतीच्या लांब दाण्यांसाठी सीता सार, सौरभ सीता आणि डंकेल यांसारख्या सामान्य तांदूळांचे नमुने घेतले जातात.
जर कतरनी तांदूळ बनवायचा असेल तर त्याच्याशी मिळता जुळता सोभान आणि सोनम हे धान्य घेतले जाते. या सर्व तांदूळ बाजारात केवळ २६ ते ३० रुपये प्रति किलोवर विकले जातात.
धान्य कोमट पाण्याच्या टाकीत भिजविले जाते. या टाकीमध्ये सुगंधी पावडरही मिक्स केली जाते.
ओले धान्य काढून त्याला बॉयलरमध्ये टाकले जाते. यामूळे तांदूळ पूर्णपणे बासमतीसारखा सुगंध देतो.