Rice Production  - सीएनजीपाठोपाठ आता आपल्यावर अजून एक संकट उभं राहणार आहे. गव्हानंतर  (Wheat) आता तांदळाचे ( Rice) भाव वाढण्याची शक्यता आहे. आपल्या रोजच्या जेवण्यातील भात गायब होण्याची शक्यता आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात देश आहे. अनेक भागात पावसाने तडी दिल्यामुळे भात पेरणीवर संकट आलं आहे. (rice production to fall in india due to rain shortfall prices in marathi)



गव्हानंतर तांदळाचे संकट!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशिया-युक्रेन युद्धानंतर जगभरात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम म्हणजे गव्हाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. तर गव्हापासून तयार होणारे पदार्थ मैदा आणि इतर पदार्थदेखील महागले आहेत. यात आता तांदळाचं संकट उभं राहिलं आहे. या संकटाचा सामना संपूर्ण जगाला करावा लागण्याची शक्यता आहे. भात पेरणी करणारे पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेशसह अनेक राज्यांमध्ये फक्त 13 टक्के भात पेरणी झाली आहे. 


गहू, साखरेनंतर तांदळाच्या निर्यातीवर नियंत्रण?


गहू आणि साखरेनंतर तांदळाच्या निर्यातीवरही सरकार नियंत्रण आणू शकते. सरकारने निर्यातीवर नियंत्रणाचा निर्णय घेतल्यास अनेक देशांवर तांदळाचं संकट येऊ शकतं. जगामध्ये तांदळाच्या एकूण व्यापारापैकी 40 टक्के वाटा हा भारताचा आहे. 




ताटामधून भात गायब! 


तांदळाच्या उत्पादनात घट होण्याच्या भीतीने आतापासून तांदळाच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या दोन आठवड्यात पश्चिम बंगाल, ओडिशा आणि छत्तीगडमध्ये तांदळाच्या किमती 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. आता तांदळाचे उत्पादन ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतील पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे आगामी दिवसांमध्ये महागाईचं संकट येण्याची शक्यता आहे.