Rishbh Pant Car Accident: टीम इंडियाचा स्टार किक्रेटर ऋषभ पंत याच्या कारला सकाळी भीषण अपघात झाला आहे. रूरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर गावाजवळ पंतची कार रेलिंगला धडकली. त्याची गाडी डिव्हायडरला धडकल्यानंतर त्या गाडीनं जोरात पेट घेतला. या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेजही (cctv footage rishbh pant car accident) सध्या सगळीकडे व्हायरल होतो आहे. परंतु इतक्या सुप्रसिद्ध क्रिकेटरचा अपघात होऊनही मात्र त्यांच्या मदतीला कोणी आलं नाही असं कळते आहे. त्याउलट त्याच्या खिशातून पडलेले पैसे आणि त्याच्या जखमी अवस्थेतील त्याचे फोटो आणि व्हिडीओजच (videos) लोकांनी काढायला सुरूवात केली अशी माहिती कळते आहे. घडल्या प्रकाराचं गांभीर्य पाहत त्याला ताबडतोब रूग्णालयात दाखल (Rishbh Pant in Hosiptal) करण्यात आलं आहे. त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या गाडीचा वेग हा साधारण ताशी 200 किमी असा होता. (Rishabh Pant Car accident people make videos and collect money instead of helping Rishabh Pant)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिषभ पंतचे फोटो आणि व्हिडीओज समोर आले आहेत. त्यात त्याच्या गाडीचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला आहे. त्यातून आपला जीव पकडत ऋषभ कारमधून बाहेर पडत होता त्याला जखमी अवस्थेत पडलेलं पाहून लोकांनी त्याला रूग्णालयात नेले. त्याचसोबत त्याची प्रकृतीही सुधारते आहे. परंतु त्याचा अपघात झाला त्यावेळी मात्र अनेकांना बघ्याची भुमिका घेतल्याचा धक्कादायक प्रकार कळतो आहे. 


बापरे, ऋषभच्या कारमधून चक्क सापडेल लाखो रूपये? 


रिषभ पंतचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या गाडीत असलेले तीन ते चार लाख रूपयेही लोकांनी लंपास करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते आहे परंतु यात अजून काही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्याचा कार अपघात झाल्यानंतर त्याच्या गाडीतले हे सर्व पैसे रस्त्यावर विखुरले होते. त्यातून बाजूला मात्र रिषभ पंत जखमी अवस्थेत होता परंतु त्याला उचलून रूग्णालयात नेण्याऐवजी ते लाखो रूपये ते खिशात टाकण्याच्यात आणि त्याचा फोटो आणि व्हिडीओ काढण्यातच मग्न राहिले होते असे कळते आहे. 


त्या दोन तरूणांनी केली मदत


अशा कठीण प्रसंगी ऋषभ स्वत:ला वाचण्याचा प्रयत्न करत होता. परंतु तो पुर्णत: जखमी असल्यानंं मात्र त्याला स्वत:ला सावरता आले नाही आणि त्याचवेळी त्या दोन तरूणांनी माणूसकी दाखवत त्याला रूग्णालयात दाखल केले. 


कोण होते ते तरूण? 


अपघातानंतर ऋषभ पंतला पहिल्यांदा हरियाणा रोडवेजचे बस चालक सुशील कुमार यांनी पाहिले. त्यांनीच त्याला कारमधून बाहेर काढण्यास मदत केली आणि रुग्णवाहिका बोलावून त्याला रुग्णालयात पाठवले. सुशीलने सांगितले की तो रक्ताने माखलेला होता आणि त्याने तो क्रिकेटपटू ऋषभ पंत असल्याचे सांगितले. यातील एक तरूण हा पुरकाजीजवळील शकरपूर इथला रहिवासी आहे. अपघात झाला तेव्हा तो लिबरहेरी येथील साखर कारखान्यात होता. तो सकाळी आपल्या ड्युटीवर जात होता. अपघात झाल्यावर त्यानं ऋषभला ओळखलं आणि त्याच्यावर उपचारासाठी नेलं. हॉस्पिटलमध्येही ते दोघं त्याच्यासोबत होते आणि नंतर भेटायलाही आले. सुरूवातीला ऋषभची प्रकृती गंभीर होती पण त्यात आता हळूहळू सुधारणा होते आहे असं डॉक्टरांनी सांगितल्याची बातमी समोर येते आहे.