Rishabh Pant Car Accident: क्रिकेटमुळं वाचला ऋषभचा जीव?; त्याच्या जिद्दीला सलाम
Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंत यांच्या कारला आज सकाळी (शुक्रवार) भीषण अपघात झाला आहे. त्यातून आपला जीव वाचवत ऋषभनं गाडीतून उडी घेतली आहे. त्यानं गाडीच्या खिडकीची काच तोडली आहे.
Rishabh Pant Car Accident: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंताचा आज सकाळी दिल्लीहून परत येताना कारचा भीषण (Rishabh Pant News) अपघात झाला आहे. वाटेत झोप गेल्यामुळे आणि गाडीचा वेग 200 किमी असल्यानं गाडीचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. त्यातून या गाडीचा अपघात इतका भीषण होता की गाडी थेट दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात ऋषभला गंभीर दुखापत झाली आहे. त्यातून या भीषण अपघातातून वाचत त्यानं कारची काच फाडून बाहेर उडी टाकली (Rishabh Breaks Car) अशी माहिती समोर आली आहे परंतु अशा प्रकारे आपला जीव वाचवत ऋषभ बाहेर आल्यामुळे क्रिकेटच्या खेळाडूवृत्तीचा (Cricket) फायदा ऋषभला झाला असल्याचं लोकं म्हणून लागल्याचे दिसते आहे. परंतु नक्की प्रकार काय घडला जाणून घेऊया. ऋषभची गाडी जळून खाक झाली परंतु डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भारतीय क्रिकेट संघालाही त्यानं अनेकदा संकटातून बाहेर काढलं आहे अशी त्याची ओळख आहे आणि यावेळीही ऋषभनं आपला जीव वाचवण्यासाठी आपली खेळाडूवृत्ती जागृत करत शर्थीचे प्रयत्न केले आहेत. आपल्या आयुष्यातील हे मोठं संकट पार करण्यासाठीही त्यानं जीवाची बाजी लावली आहे आणि याच खेळाडूवृत्तीचा उपयोग करत त्यानं स्वत:ला यातून बाहेर काढलं आहे. यावेळी गाडीची काच फोडून ऋषभ गाडीच्या बाहेर पडण्यात यशस्वी झाला.
ऋषभच्या जिद्दीला सलाम :
डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात ऋषभ पंतला दाखल करण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हरिद्वारचे एसएसपी अजय सिंह यांनी सांगितले की, हा अपघात पहाटे झाला असून अपघातानंतर गाडीला आग लागली आणि कारच्या खिडकीतून तो बाहेर पडला. रिषभ पंतही हा कायम आपली स्पॉर्ट्समन स्पिरिट कायम राखून आहे. त्यातून तो सोशल मीडियावरही आपले फीटनेस फोटोज आणि व्हिडीओज पोस्ट करत असतो. ऋषभ या मोठ्या अपघातातून लवकरच बरा व्हावा अशी इच्छा आणि प्रार्थना त्याचे चाहते करत आहेत. आतापर्यंत ऋषभ पंतनं 33 कसोटी सामन्यांमध्ये 5 शतके आणि 11 अर्धशतकांच्या मदतीने 2,271 धावा केल्या आहेत.त्याने 30 एकदिवसीय आणि 66 टी-ट्वेंटीमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
ऋषभच्या गाडीला भीषण अपघात झाला असून त्याच्या गाडीची अवस्था फार वाईट झाली आहे. त्यातून त्याच्या गाडीतले चार लाख रूपयेही काही लोकांनी लंपास केले आहेत. सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.