सध्या असा दावा कऱण्यात येतोय की उन्हाळ्यात गाडीच्या टाकीत इंधन पूर्ण भरू नका. टाकी अर्धी रिकामी ठेवा...नाहीतर गाडीच्या टाकीचा स्फोट होऊ शकतो...हा दावा केल्याने अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंच गाडीच्या टाकीचा स्फोट होऊ शकतो का...? हा संभ्रम लोकांच्या मनात आहे...हा दावा इंडियन ऑईलच्या नावाने केलाय...यासंबंधीचा मेसेज व्हायरल होतोय. या व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.


व्हायरल मेसेज


वाढत्या उष्णतेमुळे गाडीच्या टाकीतील पेट्रोल, डिझेलला आग लागून स्फोट होऊ शकतो.त्यामुळे गाडीत इंधन भरताना टाकी अर्धी रिकामी ठेवा आणि दिवसांतून एकदा टाकीचं झाकण उघडून आत तयार होणारा गॅस बाहेर काढा.


हा दावा केल्यानं याची सत्यता काय आहे, याची आम्ही माहिती घेतली. याबाबत खरी माहिती गाडी बनवणा-या कंपन्या आणि इंधन बनवणा-या कंपन्याच देऊ शकतात. त्यांनी दिलेल्या माहितीतून काय समोर आलं, ते पाहूयात


नेमकं सत्य काय?


  • व्हायरल मेसेजमधील दावा इंडियन ऑयलने फेटाळला

  • सुरक्षेच्या नियमांचं पालन करून गाडीच्या टाक्या बनवल्या जातात

  • उष्णता वाढली तरीही पेट्रोल, डिझेल पेट घेत नाही

  • गाडीची टाकी फूल केल्यास स्फोट होत नाही



उन्हाचा कडाका वाढत चाललाय.त्यामुळे लोकांना घाबरवणारे असे मेसेज व्हायरल केले जातात.असे मेसेज वाचून घाबरून जाऊ नका.याची आधी तज्ज्ञांकडून माहिती घ्या. याबाबतची सत्यता जाणून घेतल्यानंतर हा दावा असत्य ठरला असून, कंपनी सुरक्षेच्या दृष्टीनेच गाड्या बनवते, असं समोर आलंय.