`या` IAS अधिकाऱ्याने अडवाणींना केली होती अटक, आता मोदींनी बनवलं मंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारात ९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती दिलीय. यामध्ये एका अशा व्यक्तीचा समावेश आहे ज्याने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना अटक केली होती.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारात ९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती दिलीय. यामध्ये एका अशा व्यक्तीचा समावेश आहे ज्याने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना अटक केली होती.
बिहारच्या आरा मतदारसंघातून आर. के. सिंह हे खासदार आहेत. त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. आर. के. सिंह यांनीच लालकृष्ण अडवाणी यांच्यावर अटकेची कारवाई केली होती.
१९९० साली लालकृष्ण अडवाणी यांनी रथ यात्रा काढली होती. अडवाणी सोमनाथ येथून अयोध्याला रथ यात्रा घेऊन जात होते. त्यावेळी बिहारमध्ये रथ यात्रा रोखली आणि त्यांना अटक करण्यात आली. आर. के. सिंह हे समस्तीपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी होते.
निवृत्तीनंतर आर. के. सिंह यांनी राजकारणात प्रवेश केला. २०१४मध्ये आरा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आर. के. सिंह निवडून आले आणि खासदार बनले. त्यांना पहिल्यांदाच केंद्रीय राज्यमंत्री बनण्याची संधी मिळाली.
आर. के. सिंह हे १९७५च्या बॅचच्या बिहार केडरचे माजी आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी केंद्रीय गृहसचिवपदही भूषवलं आहे. ते कायद्याचे खूप चांगले जाणकार आहेत.