सीमा हैदरला परत पाठवले नाही म्हणून हिंदू मंदिरावर रॉकेट हल्ला; पाकिस्तानी डाकूंनी दिली होती धमकी
मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुममध्ये एक फोन आला होता. सीमा हैदर पाकिस्तानात परतली नाही तर भारताचा नाश होईल. 6/11प्रमाणे दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहा, याकरता उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असेल अशी धमकी देण्यात आलेय.
Seema Haider Love Story : प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सामी हैदर (Seema Haider) भारतासाठी धोकादायक ठरणार आहे. कारण भारताने सीमा हैदरला परत पाठवलं नाही तर हिंदू मंदिरांवर हल्ले करण्याची धमकी देत पाकिस्तानी डाकूंनी खळबळ उडवून दिली होती. या डाकूंनी नुसती धमकी दिली नाही तर, त्यांनी प्रत्यक्षात हिंदू मंदिरांवर रॉकेट हल्ला केला आहे. यामुळे सीमा हैदर प्रकरण भारतासाठी चिंता वाढवणारे ठरू शकते. कारण, सीमा पाकिस्तानात परतली नाही तर भारतात 26/11 प्रमाणे हल्ले होतील असा धमकीचा फोन देखील मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला आला आहे.
पाकिस्तानी डाकूंची Video जारी करत धमकी
मागील काही दिवसांपासून पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिन यांची लव्ह स्टोरी चांगलीच चर्चेत आहे. दोघांची पबजी गेमवर ओळख झाली, त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सचिनच्या प्रेमासाठी सीमा घरदार सोडून भारतात आली आहे. पाकिस्तानी डाकू राणो शारने सीमा हैदरला पाकिस्तानात परत न पाठवल्यास पाकिस्तानमधील मंदिरांवर हल्ला करण्याची धमकी Video जारी करत दिली होती.
हिंदू मंदिरावर हल्ला
यानंतर रविवारी पाकिस्तानमध्ये एका हिंदू मंदिरावर हल्ला झाला आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी DAWN याबाबतचे वृत्त दिले आहे. रविवारी डकैतांच्या टोळीने सिंधमधील कश्मोर येथील एका मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला केला आहे. गौसपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हल्लेखोरांनी प्रार्थनास्थळ आणि आसपासच्या समाजाच्या घरांवर देखील हल्ला करण्यात आला आहे. त्यांनी केवळ मंदिराला लक्ष्य केले नाही तर अंदाधुंद गोळीबारही केला. यानंतर काश्मीर-कंधकोटचे एसएसपी इरफान सामो यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. सीमा हैदर पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील रहिवासी आहे.
काय आहे सीमा हैदर प्रकरण?
पाकिस्तानी विवाहित महिला सीमा हैदर आपल्या चार मुलांसह ती भारतात पळून आली. बिहारमध्ये राहणा-या सचिन नावाच्या भारतीय प्रियकराशी तिनं लग्न केले. त्यांच्या लग्नामुळं भारत आणि पाकिस्तानातही मोठी खळबळ उडाली आहे. ऑनलाईन गेम पब्जी खेळता खेळता दोघांचं प्रेम जुळलं. नेपाळमध्ये जाऊन त्यांनी हिंदू पद्धतीनं गुपचूप लग्न केलं. त्यानंतर ती पुन्हा पाकिस्तानला गेली आणि चार मुलांना सोबत घेऊन नेपाळमार्गे बिहारला आली. मात्र, ती पाकिस्तानी असल्याचं रहस्य फार काळ टिकलं नाही. गैरमार्गानं भारतात परतलेल्या सीमाला आणि सचिनला पोलिसांनी अटक केली. तब्बल पाच दिवस त्यांना पोलीस कोठडीत डांबलं. आता दोघांचीही सुटका झालीय. मात्र सध्या भारत सोडून कुठंही जायचं नाही, असं तिला बजावण्यात आले आहे.